प्रतिनिधी/चिखली
प्राप्त माहिती नुसार ही त्याच ठिकाणी घडलेली दुसरी घटना.
दिनांक 23 नोव्हेंबर ला ही दोन्ही चुमुकले नामे अंजली नामदेव गवारे वय 8 वर्ष आणि कृष्णा दामोधर गवारे वय 6 वर्ष राहणार सवना येथील रहिवासी आहेत. दोन्ही बालकांच्या घरची आर्थिक परिथिती अतिशय नाजूक असल्या कारणाने वडील कामाला गेले होते.
व आई सोबत शेतात मेंढ्या वळत असतांना आई इतर मेंढ्या हाकल्याण्यासाठी मेंढ्याकडे गेली होती. दोन्ही चुमुकले अचानक खेळता खेळता कधी पाण्यात पोहण्यासाठी गेले हे आईला कळलेच नाही. जेंव्हा आईला चिमुकले दिसलें नाही तेंव्हा तिने शोध घेण्यास सुरवात केली. तर आईला अचानक त्यांचे कपडे पाण्याच्या कट्याजवळ दिसून आले . आई चंद्रभागा नामदेव गवारे यांनी दोघांना आवाज दिले असता त्यांचा आवाज आला नाही. म्हणून आईने आरडा ओरडा केली व त्याच क्षणी ही माहिती गावात फोन द्वारे लोकांना माहित झाली.
प्राप्त माहितीनुसार गावातील व्यक्तींना फोन आल्यानंतर सर्वांणी घटना स्थळी धाव घेतली.तेथे पोहचून दिनकर ज्ञानेश्वर दातार, बाळू गिरी, गजानन आदमाने, शुभम अफ्रुतकर यांनी घटना स्थळी जाऊन त्या पाण्यात डुबलेले दोन्ही चुमुकल्यांचे मृत्यूदेह सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पाण्याच्या बाहेर काढले. नंतर सवना गावाचे पोलीस पाटील मंगेश करवंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन चिखली पोलीस स्टेशनला काळविले व सायंकाळी 6 च्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहचून त्यांनी झालेल्या घटनेचा पंचनामा करून मृत झालेल्या चुमुकल्यांना P. M साठी चिखली शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. अश्या घटना ग्रामीण भागात पुन्हा होऊ नये या साठी प्रशासनाणे विशेष उपाय योजना राबव्यायात असे नागरिकांकून बोल्या जात आहे जेणे करून असे दुर्देवी मृत्यू होण्यास आळा घालता येई