जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील भाजपासह इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई शिवसेना भवन येथे शिवसेनेत प्रवेश केला
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धती व प्रेरित होऊन शिवसेना नेते माननीय श्री खासदार संजय राऊत साहेब शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई साहेब उत्तर महाराष्ट्र समन्वयक माननीय आमदार श्री रवींद्र मिर्लेकर साहेब यांच्या हस्ते रावेर लोकसभा संपर्कप्रमुख माननीय श्री विलास जी पारकर साहेब रावेर लोकसभा सहसंपर्कप्रमुख माननीय आमदार श्री अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे जिल्हा प्रमुख माननीय श्री आमदार चंद्रकांतभाऊ पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली जामनेर विधानसभा क्षेत्रातील भाजपा प्रहार तसेच इतर राजकीय पक्षातील पदाधिकारी यांनी शिवसेना पक्ष मध्ये प्रवेश केला आहे .
जामनेर विधानसभा संपर्कप्रमुख माननीय श्रीकांतजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेर विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा खालील प्रमाणे जाहीर पक्ष प्रवेश करायला प्रहार जनशक्ती पक्षातील मयूर सुभाष पाटील युवक तालुकाध्यक्ष, मनोज जनार्दन सनांसे युवक तालुका उपाध्यक्ष, भूषण नारायण कानडजे युवक तालुका संपर्कप्रमुख, सागर नवनाथ बेलेकर युवक तालुका सरचिटणीस, तसेच मोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य पैकी भावसिंग मन्साराम जाधव सरपंच पती, संतोष जयसिंग चव्हाण उपसरपंच, विश्राम नरसिंग चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, विनोद चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, अनिल प्रेमराज चव्हाण, हिवरखेडा तवा या गावातील प्रशांत युवराज आहिरे सरपंच पती, मंगलसिंग कापडसिंग पवार उपसरपंच, ज्ञानेश्वर भीमराव जगताप आरपीआय तालुका सदस्य, जनार्दन कुमाका, संतोष पाटील, चिंचखेडा तवा येथील अमित फकीरा तडवी उपसरपंच, हनीफ मानका तडवी उपाध्यक्ष आदिवासी संघटना, वाकडी या गावातील अकबर तडवी माजी सरपंच, प्रवीण सुरेश गायकवाड ग्रामपंचायत सदस्य, तळेगाव येथील दीपक आत्माराम पाडळसे ग्रामपंचायत सदस्य, पिंपळगाव गोलाईत येथील हरिसिंग अंबादास सिसोदिया ग्रामपंचायत सदस्य, तसेच विविध संघटनेच्या पदाधिकारी पैकी कैलास दांडगे जिल्हा अध्यक्ष धनगर महासंघ, जळगाव जिल्हा भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर चोरडिया, यांच्या सह इतर पक्षातील पदाधिकारी यांनी प्रवेश घेतला. यावेळी जामनेर विधानसभा मतदार संघातून जळगाव जिल्हा उपजिल्हा प्रमुख शिवसेना डॉक्टर मनोहरदादा पाटील,युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील, जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील, माजी युवासेना उपजिल्हाप्रमुख एडवोकेट भरत पवार, शिवसेना उपतालुका प्रमुख कृष्णा चोरमारे, शेंदुर्णी शिवसेना शहर प्रमुख भैया गुजर, विभाग प्रमुख मोहन जोशी, सोशल मीडिया तालुकाप्रमुख मुकेश जाधव, सोशल मीडिया उपतालुका प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.