अमरावती प्रतिनिधी जयकुमार बुटे
स्थानिक अमरावती येथे काल झालेल्या मुस्लिम समुदायाने मोर्चाच्या माध्यमातून केलेली तोडफोड यांच्या विरोधात आज सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आला होता सकाळी 9 वाजेपासून या मोर्चाला राजकमल चौक येथून येथून सुरुवात झाली त्यानंतर विविध प्रकारचे संघटना व पक्षीय नेते या ठिकाणी हजर होत गेले परंतु काही वेळा नंतर काही समाजकंटकांनी त्यावर दगडफेक केली व मोर्चा मधील कार्यकर्ते यांची धावपळ सुरुवात झाली.
पोलिस प्रशासन यांनी काही ठिकाणी लाठीचार्ज केल्यानंतर मोर्चा मधील काही कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जाळपोळ व दगडफेक करायला सुरुवात केली यामध्ये नाव प्रहार न्यूज पेपर अमरावती प्रतिनिधी संजय पवार जखमी झाले आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले याची माहिती पोलीस आयुक्त आरती सिंग यांना माहिती देण्यात आली मॅडम जयपूरला असताना माहिती घेतली व ताबडतोब 188 कलम दाखल करून पुढील चार दिवस अमरावती बंद केले व नागरिकांना शांतता व सुव्यवस्था पाडण्यात यावी अशा आदेश दिले मोर्चामध्ये मोठे नेते सर्व पक्षांचे उपस्थित होते