Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जळगाव वरुन निघालेली बस एरंडोल येथुन मनसे कार्यकर्त्यांनी परतवली

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल  प्रतिनिधी

प्रतिनिधी - एरंडोल बस स्थानकावर आज रोजी जळगांव येथून पोलीस बंदोबस्तात निघालेली एस.टी.महामंडळाची बस क्र.एम.एच. 20 बी.एल. 3936 जळगाव - धुळे गाडी एरंडोल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने ने पुढे न जाऊ देता पुन्हा जळगांव येथे परत पाठविली.



     सध्या महाराष्ट्रात एस. टी.कर्मचारी संपावर असल्याने एकही बस रस्त्यावर धावताना दिसत नाही आहे.त्याअनुषंगाने आज दि.२१ रोजी जळगाव बस डेपो मधुन शासनाने प्रतीक्षा यादी मध्ये समाविष्ट असलेल्या एस. टि.कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन त्यांना जळगाव डेपो मधुन धुळ्यासाठी बस घेऊन जाण्यास सांगितले.त्यानुषंगाने आज एरंडोल येथे जळगाव डेपोची धुळे जाणारी बस ४,५ प्रवासी घेऊन एरंडोल बस स्थानकात येऊन पोहचली त्यावेळी याठिकाणी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, मनसे तालुकाध्यक्ष विशाल सोनार यांनी विनंती करीत नवीन कर्मचारी यांना समजावले व गाडी परत जळगाव डेपो येथे पाठवली.याप्रसंगी सदर बस वरील वाहक व चालक यांनी आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्यांना हात जोडुन कृतज्ञा व्यक्त केली. दरम्यान नवीन कर्मचारी यांना कुठलेही प्रशिक्षण नसतांना व कोणत्याही प्रकारे शासनाच्या नियमात बसत नसल्याने या आधीच मनसे ने या भारती ला विरोध केला आहे.

      याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष अनिल वाघ यांनी आंदोलनाला बसलेल्या एस. टी.कर्मचाऱ्यांना मनसे शेवट पर्यंत तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन देत असल्याचे सांगुन निवेदन तशा आशयाचे दिले. यावेळी शहराध्यक्ष प्रा.सुहास महाजन, उपशहर अध्यक्ष बापू महाजन, उपजिल्हाध्यक्ष ग्यानु पाटील, अमोल, परवेज,तालुका उपसंघटक गणेश जाधव  यांच्या सह करकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.