Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

येवती या गावात समाजासाठी स्मशानभूमी नाही

Responsive Ad Here

प्रदिप रघुते येनस

तब्बल 3500   लोकसंख्ये चे गाव असून, गावामध्ये नामांकित पत्रकार, प्रगतिशील शेतकरी, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर, शिक्षक आणि विविध क्षेत्रांमध्ये सेवेरत नौकारदर वर्ग खूप मोठया संख्येने आहे. तरी ही गावामध्ये स्मशान भूमी नसल्याचे ग्राम पंचायतीला गांभीर्य नाही.


याठिकाणी स्मशानभूमी नसल्याने कुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी ग्रामस्थांची मोठी पंचाईत होते. ज्यांची शेती गावालगत आहे, त्यांच्या कुटुंबातील कुणाचे निधन झाल्यास स्वतःच्या शेतात अंत्यविधी केला जातो. तेही पाऊस आला तर तात्पुरते  अंतविधी थांबवला  जातो. 


इतरांसाठी गावाच्या कडेला जिथे  जमीनीवर अंत्यविधी केला जातो. या जागेकडे जाण्यासाठी सुद्धा रस्ता नसल्याने ग्रामस्थांचे हाल होतात. पावसाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांची व नातेवाईकांची गैरसोय होते. जिवंतपणी तसेच मरणानंतर ही इथे स्वतःच्या सुटके साठी झगडावे लागते.  

शेवटचा मरणोत्तर प्रवास तरी सोयीस्कर व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या गंभीर विषयाकडे प्रशासन लक्ष देऊन ग्रामस्थांना न्याय देणार का ? येवती गावातील लोकांना मरणोत्तर तरी स्वातंत्र्य मिळणार का ?