बुलढाणा प्रतिनिधी
बुलढाणा जिल्हातील मेहकर शहरातील येथील जानेफळ रोडवर स्थित असणाऱ्या घरकुल व इकरा नगर मधील दोन बालक १७ नोव्हेम्बरच्या सकाळी ९ वाजता पासून हरवले होते अखेर ४ वाजता दोन्ही बालकांचे शव घरकुलच्या परिसरातील खदाणीत पाण्यावर तरंगताना दिसून आल्याने एकच कल्लोळ माजला दोन्ही एक कुलते एक बालक काळाने हिरावून नेले. मेहकर येथील जनेफळ रोडवर स्थित घरकुल परिसरात असणाऱ्या इकरा नगर मधील शेक अन्सार शेक छोटू यांच्या घरी त्यांच्या बायकोला भेटण्या साठी अकोला जिल्हातील पातूर येथून त्यांची साळी व साडेचार वर्षीय मुजैफ हा बालक आला होता तर बाजूलाच असणाऱ्या घरकुल मधील सारफत खान यांचा एक कुलता एक मुलगा असजद खान वय ३ वर्ष दोन्ही मुले लहान सायकल घेऊन बाहेर खेळत होते सकाळी ९ वाजता खेळण्यासाठी बाहेर गेलेले असजद खान व मुजैफ दुपार परियानंत घरी परतले नाही तेव्हा घरच्यांनी पाहायला सुरवात केली दोन्ही बालके कोठेही न सापडल्याने अखेर सोशल मीडियावर बालके हरवण्याची पोस्ट टाकून बालक सापडण्या साठी धडपड सुरू होती तर इतर नातेवाईक बालकांचा शोध घेत होते इतक्यात घरकुल परिसराला लागून असलेल्या खदाणीवर कपडे धुणाऱ्या महिलांना दोन बालकांचे शव पाण्यावर तरंगताना दिसून आले .
याची माहिती इतरांना दिल्यावर बालकांच्या घरच्यांनी खदानवर येऊन पाहिले असता त्यांच्या काळजाचा ठोका चुकला ज्या चिमुकल्यांना शोधण्यासाठी संपूर्ण मेहकर पालथं घातलं ते बालके खदाणीत पडलेले होते त्यातच त्यांचा करून अंत झाला. साडेचार वर्षीय मुजैफ हा त्याचा मावशीच्या घरी १६ तारखेला आला होता अश्यात मावशीच्या घरी त्याच्या सोबत खेळणारा लहान कोण्हीही नसल्याने घरकुल मध्ये इकरा नगर मध्ये राहणारे सराफत खान यांचा तीन वर्षीय मुलगा असजद खान यांच्या मुला सोबत सकाळ पासून सायकल खेळत होता अश्यात केव्हा हे नकळत खदाणी कडे गेलेत आणि खदाणीत पडले हे कोणालाही कळले नाही हसत गेलेले दोन्ही बालकांचे परत घरी मृतदेहच गेले यात दोन्ही बालके ही एक कुलते एकच होते.