Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रेणुका माता मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी देऊळगाव राजा आज नऊ वर्ष पूर्ण झाले

Responsive Ad Here

 भीमराव  चाटे दे राजा 

रेणुकामाता अर्बन या शाखेला नऊ वर्ष झाले असून दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त राजू गोरखा एच ओ डी मॅनेजर व्यवस्थापक अलका शिंदे ,प्रिया राठोड, गोपाल चव्हाण, निलेश श्रीराम वनवे ,प्राचार्य सावरकर सर, उदासी सर, सैनिक मित्र भिमराव चाटे त्यांनी सकाळीच महापूजेला हजेरी लावली.



 सर्वांशी जिव्हाळ्याचं नातं जपणारी रेणुका माता अर्बन सोसायटी बँक देऊळगाव राजा शनिवार पेठ जाफराबाद वेस जवळ बालाजी रोडला आहे नऊ वर्षापासून ग्राहकांची एकनिष्ठ पणे सेवा देत आहे आजची पूजा सेवानिवृत्त शिक्षक श्रीराम वाघोजी वनवे सह पत्नी सुनीता श्रीराम वनवे बँकेची लाभार्थी यांनी केली ,रेणुकामाता अर्बन च्या महाराष्ट्र मध्ये 117 शाखा असून देऊळगाव राजा शाखेचा वार्षिक उलाढाल  पन्नास कोटी च्या जवळपास होत असतो शाखेचा व्याजदर वाढीव असल्यामुळे या शाखेचे लाभार्थी भरपूर आहेत.

 ठेवीचे व्याजदर आकर्षक मिळतात ज्येष्ठ नागरिक विधवा महिला अपंग व्यक्ती व माजी सैनिकांना 50 टक्के व्याजदर जास्त आहे कर्ज योजना मध्ये वैयक्तिक कर्ज, घर तारण कर्ज, कॅश क्रेडिट ,शैक्षणिक कर्ज, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कर्ज, गहाणखत कर्ज, वैद्यकीय कर्ज ,आणि तात्काळ कर्ज ही शाखा देते .

माजी सैनिकांना व्याजदर जास्त देते आणि सेवानिवृत्त माजी सैनिकांचा सत्कारही यावेळी बँकेचे कर्मचारी अलका शिंदे राजू गोरखा यांनी केला वर्धापन दिनानिमित्त काही लाभार्थींनी दहा बारा लाख रुपये चे बचत पत्र केले वर्धापन सोहळा पार पडला