Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदी कुणाल रमेश महाजन यांची बिनविरोध निवड.

Responsive Ad Here

प्रतिनिधी 

एरंडोल नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष आरती अतुल महाजन यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदाकरीता आज दि .०२ / ११ / २०२१ रोजी दुपारी १२.०० वा . विशेष सभेचे आयोजन जिल्हाधिकारी जळगांव यांचे आदेशानुसार करण्यांत आले होते . सभेचे पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार एरंडोल सुचिता चव्हाण यांनी काम पाहिले.दुपारी १२.०० वाजेपर्यंत एकमेव उमेदवार कुणाल रमेश महाजन यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले असता उपाध्यक्ष पदाकरिता एकाच उमेदवाराचे दोन्ही अर्ज वैध असल्याने कुणाल रमेश महाजन यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले . निवडकामी सुचिता चव्हाण पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार एरंडोल यांना मुख्याधिकारी विकास नवाळे व कार्यालय अधिक्षक हितेश जोगी यांनी सहकार्य केले .

      याप्रसंगी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार यांचे नगरपालिकेच्या वतीने स्वागत केले तसेच तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष कुणाल महाजन यांचे अभिनंदन केले.

  सदर निवडीसाठी नगराध्यक्ष रमेश परदेशी ,नगरसेविका छाया आनंद दाभाडे ,नगरसेवक शेख जहिरोद्दीन कासम , डॉ. नरेंद्र ठाकूर ,नगरसेविका प्रतिभा पाटील ,जयश्री पाटील , नगरसेवक अड. नितीन महाजन , नगरसेविका आरती महाजन ,नगरसेवक मोमीन अब्दुल शकूर अलतीफ,नगरसेविका दर्शना ठाकूर,हर्षाली महाजन उपस्थित होते . श्री . कुणाल रमेश महाजन यांची एरंडोल नगरपालिकेच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबदल त्याचे उपस्थितांनी  अभिनंदन केले . एरंडोल नगरपालिका उपाध्यक्ष पदाची निवडणूक पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार एरंडोल खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पारपाडल्या बाबत सर्व उपस्थितांचे पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार एरंडोल यांनी आभार मानले .