भिमराव चाटे प्रतिनिधी देऊळगाव राजा
दिनांक ०२ नोव्हेंबर २०२१ रोज मंगळवार वेळ सकाळी ११ वाजता उमरद. सिंदखेड राजा जिल्हा बुलढाना येथ*त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य द्वितीय वर्धापन दिनानिमित सैनिक स्नेह मेळावा आयोजित केला त्यामध्ये महाराष्ट्र राज्य मधील 32 जिल्ह्यातून त्रीदल सैनिक जिल्हाध्यक्ष व कोर कमिटी मेंबर्स आजी व माजी सैनिक त्रिदल सैनिक मेळाव्यात सहभागी झाले व कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती: मा.मंत्री आमदार श्री. राजेंद्र शिंगणे ( पालक मंत्री जिल्हा बुलडाणा. अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य) नाझेर काझी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा जिल्हा अध्यक्ष तसेच त्रिदल सैनिक सेवा संघ चे ज्येष्ठ श्री. अशोक चौधर साहेब कोर कमिटी अध्यक्ष गुरुवर्य गजानन दादा शास्त्री शिवचरित्रकार व कीर्तनातून सैनिक मांडणारे ह भ प सुनील महाराज गाडेकर आणि सैनिकांचे सैनिक हृदयसम्राट श्री. संदिप भाऊ लगड साहेब त्रिदल सैनिक सेवा संघ संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, भिमराव महादेव चाटे कोर कमिटी सचिव महाराष्ट्र राज्य, काशिनाथ पंडित साहेब सरचिटणीस ,प्रभाकर देशमुख साहेब त्रिदल जिल्हा अध्यक्ष बुलढाणा यांनी पालक मंत्री डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेबा सह दीपप्रज्वलन केले .त्या अगोदर बसस्थानकापासून ते नरसिंह मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली. किनगाव राजा पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी सुरक्षा दिली ग्रामपंचायत कार्यालयात एक कोटी अडीच लक्ष रुपये च्या केलेल्या कामांचा लोकार्पण सोहळा व पुढील मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन झाले .
व रॅली पुढे नरसिंह मंदिर सभामंडपामध्ये आली. दशावतारातील चौथा अवतार नरसिंह भगवंताचे दर्शन करून मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झाले. सभामंडपामध्ये विशेष आकर्षण हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराज व मावळे ऐतिहासिक वेशभूषा रंगभूषा इतिहासात घेऊन जाणारी स्पेशल स्टेज वर विराजमान होते .दीपप्रज्वलन नंतर सैनिक हृदय सम्राट संदीप भाऊ लगड यांच्यासह सर्व सैनिक टीमने ,पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र जी शिंगणे साहेब यांचा भव्य हार घालून सत्कार केला.
तसेच गावातील सरपंचापासून ते शिपायापर्यंत च्या सर्वांनी सैनिकांचा सत्कार केला. त्यामध्ये नवनाथ पगार नाशिक जिल्हा अध्यक्ष रामचंद्र गायके मराठवाडा त्रिदल प्रमुख, वामन जंजाळ जालना जिल्हा संघटक , सर्व त्रिदल सैनिक अंकुश वराडे, वसंतराव थोटे, शांतीलाल थोटे ,आप्पासाहेब साखरे , अण्णा थोटे जीएन वनारसे साहेब जालना जिल्हा सचिव प्रभारी मीडिया ,बन्सी दांडगे औरंगाबाद जि अध्यक्ष अशोक साळवे, सुनील भुजंग, नागेश मोठे, मोहम्मद शहा, विष्णू पवार, अरुण हिवाळे, डीएम ससाने ,राजेंद्र कापडे बीड जिल्हा अध्यक्ष, दिनकर थोटे जालना जिल्हा अध्यक्ष, एस के आठरे प्रवक्ता तिदल सैनिक सेवा संघ दत्तात्रय माळी सातारा जिल्हाध्यक्ष सागर सोनवणे पुणे जिल्हा अध्यक्ष, पोपटराव कापसे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विशाल घाडगे सांगली जिल्हा अध्यक्ष किशोर पवार कोल्हापूर जिल्हा, अध्यक्ष शरद कोलते फुलंब्री,भालचंद परमेश्वर ,एकनाथ राजाळे, ज्येष्ठ मासैनिक ज्ञानबा यादव मगर, मा नाथा भाऊ दराडे, दादाराव कुंडलिक डीघोळे, मधुकर एकनाथ पवार ,विष्णू आनंदा मुंडे, पांडुरंग साखरे, नवनाथ महाडिक, संजय पालवे, अरुण विखे, महादेव आव्हाड, दत्तात्रय दराडे, सर्जेराव मगर ,रामेश्वर सोळंकी, राजेश अवचार ,जगन्नाथ वाघ, विनोद डोंगरे, अनिल सावळे ,मनोज परमेश्वर, संजय इंगळे ,दीपक परमेश्वर ,प्रवीण ठोसरे, सुरेश भांबळे महाराष्ट्रातील सर्व त्रिदल सैनिकांचे उमरद वासीय राजे आशिष जाधव ,दशरथ शिनगारे, माजी सैनिक गोविंदराव केकान पोलीस पाटील उमरद, मनोहरराव राजे जाधव तंटामुक्ती अध्यक्ष, संतोष सखाराम गिरी सरपंच, गोविंदराव मुळे माजी सरपंच, राजे गजानन जाधव ,शिवाजीराव इंगळे, राजे भास्कर जाधव, राजे आनंद जाधव राजे, सतीश जाधव, राजे विनायक जाधव, राजे विठ्ठल जाधव ,राजे गणेश जाधव ,बाळासाहेब इंगळे, योगेश इंगळे ,कमल सेठ तापडिया, यांनी केले महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून आलेल्या श्रीधर सैनिकांचे स्वागत केले व पालकमंत्री राजेंद्रजी शिंगणे साहेबांचे स्वागत राजे राहुल जाधव, विकी ,रामेश्वर, विकास, विश्वजीत, नीरज, दत्तात्रेय, भैय्या ,गोपाल, धनंजय, नंदकुमार, सचिन, श्रीकांत, निलेश सर्व राजे जाधव, अनंत कुमार देशमुख, केदारनाथ मुंडे, रामेश्वर आंधळे व समस्त गावकरी उमरद देशमुख व पंचक्रोशीतील सैनिक प्रेमी मित्र मंडळ. सैन्य भरपूर होतं आर्मी नेव्ही एअरफोर्स पॅरामिलिटरी फोर्स सर्व माजी सैनिक महाराष्ट्रभरातून आले होते ,त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचे मंडळ हा सुखसोहळा स्वर्गी नाही प्रमाणे गावकरी लोकांनी आनंद लुटला साक्षात सैनिक शिवसैनिक मा सैनिक व गावकरी यांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला .
भारत माता की जय, वंदे मातरम , जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज कि जय हे नारे देऊन देशभक्तीची जागृती व अनुभती झाली. 01 11 2020 ला पहिला त्रिदल सैनिक सेवा संघाचा वर्धापन मेळावा शिरूर येथे झाला होता. त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मातृतीर्थ सिंदखेडराजा मध्ये झाली महाराष्ट्रभरातून आलेले वक्ते भरपूर होते ,पालकमंत्री साहेबांना कमी वेळ होता, म्हणून प्रत्येकाने थोडक्यात आपले मुद्दे मांडले व बरेच जणांचे मुद्दे मांडायचे राहून गेले .रूप रेखा खूप मोठी झालेली आहे ,कार्यक्रमाला खूप उशीर झाला. त्रिदल सैनिक संघटना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष राजे प्रभाकर देशमुख उर्फ चंदूकाका फौजी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करून स्मृतिचिन्ह देण्यात आले सेवानिवृत्त सैनिक जाधव साहेब यांचा सत्कार सोहळा झाला संत येती घरा तोची दिवाळी दसरा ही म्हण प्रचलित आहे परंतु सैनिकांना कोणतीही दिवाळी रंगोळी नसते त्यांच्या नशिबात आणि हातात फक्त बंदूक आणि गोळी असते आणि या नगरीमध्ये नरसिंह भगवान त्याच्या दरबारात संत महंत सैनिक म्हणजे संत्री पासून ते मंत्री पर्यंत सर्वांनी आशीर्वाद घेतले सर्वांनी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करून गावासाठी नगर भोजनाची व्यवस्था झाली होती .
सर्वांनी नगर भोजन महाप्रसादाचा आनंद घेतला व नरसिंह भगवंताची दर्शन घेऊन सर्व त्रिदल सैनिक रात्री उशिरापर्यंत आपापल्या गावी परतले. कार्यक्रम खूप मोठा होता जेवायला ही भरपूर होतं ,परंतु महाराष्ट्रभरातून आलेल्या सैनिकांचं पोट भरले नाही, कारण त्यांना जे मांडायचं होतं त्यासाठी वेळ कमी मिळाला, पुढील वेळी हा कार्यक्रम दोन शेशन मध्ये अधिक वेळ घेऊन नियोजित करूया असे सर्व सैनिक म्हणाले, जय हिंद