हिवरखेड :- जितेश कारिया
सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड येथे दि. 28 नोव्हेंबर 2021 रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत साजरी करण्यात आली. या भव्यदिव्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अनिलकुमार भोपळे हे होते, तर विशेष अतिथी म्हणून मा. अशोकराव अमानकार साहेब, मा. दिलीपराव सरनाईक, मा. कपिल रावदेवकर, मा. रमेशभाऊ आकोटकर तसेच संस्थेचे सहकार्यवाह मा. श्यामशील भोपळे, ज्येष्ठ संचालक मा. शिवशंकरजी मार्के, संस्थेच्या संचालिका अन्नपूर्णाबाई बंड, संचालक स्नेहल भोपळे, विद्यालयाच्या प्राचार्या कु.र. मो. वालोकार मॅडम तर पालक प्रतिनिधी म्हणून मा. दिलीपराव बाळापुरे सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू म्हणून वर्ग 8 (ब) ची विद्यार्थिनी कु. सौम्या दिलीप बाळापुरे हिने क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांची वेशभूषा धारण करून 'मी ज्योतिबा बोलतोय' यावर अत्यंत प्रभावी व प्रकटपणे मनोगत व्यक्त केले.
त्याचप्रमाणे विद्यालयातील विद्यार्थिनी कु. अनुजा विठ्ठल ढगे (9ब), कु. समीक्षा पुरुषोत्तम गावंडे (9ब), कु.ज्योत्स्ना देवानंद डिगे (9अ), कु.खुशी सुभाष वानखडे (9अ), कु. प्रीती मुरलीधर दामधर (9अ) , आनंद सुनील परनाटे (8अ) या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सामाजिक व शैक्षणिक कार्याविषयी त्यांचे विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या कु. र. मो. वालोकर मॅडम यांनी केले. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आपले अमूल्य मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत भोपळे सर तर आभारप्रदर्शन गणेश खानझोडे सर यांनी केले .