हिवरखेड जितेश करीया
सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दिनांक 26 नोव्हेंबर 2021 शुक्रवारला भारतीय संविधान दिनानिमित्त 'माझे संविधान माझा अभिमान' हा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अनिलकुमारजी भोपळे होते .सुरुवातीला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा- 2021 मध्ये इयत्ता पाचवी मधून कु. गौरी चंद्रशेखर ताळे, चि. क्रिष्णा मोहन राऊत व इयत्ता आठवी मधून कु. भाग्यश्री नरेश निमकर्डे, कु.अंजली राजेश टाले, कु. सृष्टी रवींद्र बाजारे व चि. यश संतोष आकोटे या शिष्यवृत्ती परीक्षापात्र विद्यार्थ्यांचे यावेळी माननीय श्री अनिलकुमारजी भोपळे (अध्यक्ष- महात्मा फुले शिक्षण संस्था हिवरखेड) व कु. र. मो. वालोकार (प्राचार्या) यांच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन अभिनंदन व कौतुक करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी यांनी संविधान वाचन केले.काही विद्यार्थी, शिक्षक व शाळेच्या मुख्याध्यापिका मा .रजनी वालोकार मॅडम यांनी भारतीय संविधानाबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन कु. रेणुका गावंडे , कु.अंबिका गावंडे यांनी व आभारप्रदर्शन कु. सपना खंडेराव या विद्यार्थ्यांनी केले.