भीमराव चाटे प्रतिनिधी देऊळगाव राजा
माजी सैनिक मित्र फाउंडेशन कृत महाराष्ट्र सैनिक करिअर अकॅडमी देऊळगाव राजा शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत सहित 13 शहीद अमर हुतात्म्यांना मौन धरून श्रद्धांजली वाहिली. अपघातातील कॅप्टन वरून सिंह यांच्या आयुष्यासाठी कामना केली. व भारतातील पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचा अल्पपरिचय. जन्म.१६ मार्च १९६८ रोजी डेहराडून येथे. बिपिन रावत हे देशातील पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस अधिकारी) होते. सीडीएसचे काम लष्कर , हवाई दल आणि नौदल यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक होते. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे होती.
बिपिन रावत यांचे वडील एल एस रावत हेदेखील लष्करात होते आणि ते लेफ्टनंट जनरल एल एस रावत म्हणून ओळखले जात होते. बिपिन रावत यांचे बालपण सैनिकांमध्ये गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यातल्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले. त्यांची तिथली कामगिरी पाहून त्यांना पहिलं सन्मानपत्र मिळालं, ज्याला SWORD OF HONOURनं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला.
बिपिन रावत अमेरिकेतून परतले आणि त्यानंतर त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना १६ डिसेंबर १९७८ रोजी यश मिळाले. त्यांना गुरखा ११ रायफल्सच्या ५ व्या बटालियनमध्ये सामील करण्यात आलं. येथून त्यांचा लष्करी प्रवास सुरू झाला. इथे रावत यांना सैन्याचे अनेक नियम शिकण्याची संधी मिळाली. रावत यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की गोरखामध्ये राहून त्यांना जे काही शिकता आले ते इतरत्र कुठंही शिकायला मिळालं नाही. इथं त्यांनी लष्कराची धोरणं समजून घेतली आणि धोरणं तयार करण्याचं कामही केलं. इथं त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आय एम ए देहराडून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केलं.
सैन्यात असताना बिपिन रावत यांना सैन्यात अनेक पुरस्कारही मिळाले होते. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली होते. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
रावत यांनी आपल्या आयुष्यातील ३७ वर्षे लष्करासाठी समर्पित केली होती. त्यांच्याकडे आणखी अनेक जबाबदाऱ्या होत्या आणि ते देशाच्या सुरक्षा मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी एक काम करत होते. बिपिन रावत म्हणत असतत, की त्यांनी एकट्याने काहीही केलं नाही. टीम वर्कमुळेच यश मिळालं. कोण्या एका व्यक्तीचं श्रेय नसून हे सर्वांचं काम आहे कोणाच्या काळात अगदी शेवटच्या घटकापर्यंत असलेला छोटासा शिपायापर्यंत त्यांनी बारकाईनं लक्ष दिलं सर्जिकल स्ट्राइक सारख्या देशी त्याच्या अनेक रणनीती कौशल्य त्यांच्याकडे होते गोरखा बटालियनपासून सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी सैन्यात अनेक पदांचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते लष्करप्रमुख झाले, आता ते भारतातील पहिले सीडीएस अधिकारी म्हणूनही काम करत होते. भारतीय आर्मी नेव्ही एअरफोर्स ते भीष्मपितामह होते बिपिन रावत साहेबांच्या जाण्याने जी हानी या देशाची झालेली आहे ती कधीही भरून निघणार नाही शौर्य चक्र सन्मानित कॅप्टन वरून सिंह अपघातातून वाचलेले आहेत त्यांना चांगले आयुष्य मिळण्यासाठी महाराष्ट्र सैनिक करियर अकॅडमी दे राजा व सर्व देशवासियांना कडून प्रार्थना जय हिंद