Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

२७ वर्षीय तरुणाने घरासमोरील निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना

Responsive Ad Here

 पहूर , ता . जामनेर  प्रतिनिधी 

  जामनेर तालुक्यातील पहूर  येथील २७ वर्षीय तरुणाने घरासमोरील निंबाच्या झाडाला  गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली .

    जामनेर -पाचोरा मार्गावर पहूर येथील लेलेनगर भागात राहणाऱ्या नारायण त्र्यंबक उबाळे ( वय - २ ७ ) या तरुणाने घरासमोरच असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीचा गळफास लावून जीवनयात्रा संपवली .  बाहेरून कडी लावली आणि मयत नारायण उबाळे   गॅरेज व्यवसायासह ट्रॅक्टर रोटावेटर चालविण्याचे काम करीत होते . काल रात्री ते ट्रॅक्टर रोटावेटर च्या कामासाठी दुसऱ्याच्या शेतावर गेले होते . शेतातील काम आटोपून रात्री दोन वाजेच्या सुमारास ते घरी आले .सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असताना नारायण उबाळे यांनी घराच्या बाहेर येऊन दाराला बाहेरून कडी लावली  आणि समोरच असलेल्या  निंबाच्या झाडाला दोरीचा गळफास तयार करून आत्महत्या केली .नेहमी प्रमाणे मयत नारायण उबाळे यांची वहिनी भावना गजानन उबाळे सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उठले . त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला .

     मात्र दाराला बाहेरून कडी लावलेली असल्याने त्यांनी दरवाजा जोरात ठोठावला .त्यांच्या या प्रयत्नात दरवाजाला बाहेरून असलेली दरवाजाची कडी उघडली गेली .त्यांनी बाहेर येउन पाहीले असता त्यांना धक्काच बसला .गळफास घेतलेल्या अवस्थेत दिराला पाहून त्यांनी त्यांच्या सासु-सासर्‍यांना आवाज दिला . झोपेतून खडबडून जागे झालेल्या होताच त्यांच्यासमोर पोटच्या गोळ्याने गळफास लावण्याचे पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला .  माहिती मिळताच पहूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला . पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .


      मयत नारायण उबाळे यांच्या पश्चात आई वडील भाऊ वहिनी असा परिवार आहे . मागील काही दिवसांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला होता . त्यांच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

 शव वाहिकेची गरज 

         पहूर हे चौफुली वरील गाव असून ग्रामीण रुग्णालयाला अनेक खेडी जोडलेली आहेत . मात्र येथे शव वाहिका  नसल्याने   मयताच्या नातेवाईकांना अडचणींना सामोरे जावे लागते . वेळप्रसंगी कुणी गाडीही देत नाही  ,त्यामुळे आधीच दुःख आणि त्याच्यात अडचणी यामुळे पहूर ग्रामीण रुग्णालयात अंतर्गत शव वाहीका  मिळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .