Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

7 डिसेंबर सशस्त्र ध्वजदिन दिवस

Responsive Ad Here

 भीमराव चाटे देऊळगाव राजा                                                     

             7 डिसेंबर सशस्त्र ध्वजदिन दिवस 1949 पासून सुरू झाला तो आजपर्यंत प्रत्येक वर्षी भारतीय आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये कर्तव्यावर आपल्या प्राणाची आहुती देणारे जहाबाज अमर शहिदांचा शहादत सन्मान जवानांच्या परिवाराच्या  सुविधांसाठी, झेंडा दिवसाचे तिकीट देऊन देशवासीयांच्या मनात देशभक्ती जागृत होते. व त्यातूनच ध्वजदिन निधी संकलनाचा उपक्रम चालू राहतो. शाळा, कॉलेज ,विद्यापीठे ,हॉस्पिटल ,बसस्थानक, रेल्वेस्थानक ,वन विभाग, महसूल विभाग, बांधकाम विभाग, विद्यार्थ्यांपासून ते शिक्षण अधिकारी पर्यंत, शिपायापासून ते तहसीलदार जिल्हाधिकारी महोदय पर्यंत , ग्रामपंचायत शिपाई पासून ते सरपंच ग्रामसेवक गटविकास अधिकारी पर्यंत जवळ जवळ सर्व विभाग लहानथोर कर्मचारी व अधिकारी वर्ग ध्वजनिधी चे योगदान देतात आणि या योगदानातून च शहीद जवानांचे परिवार युद्धात अपंगत्व आलेल्या जवानांचे परिवार माजी सैनिक परिवार यांच्या अनेक योजना साकारल्या जातात. भारताची सेना नेहमी जवान राहावी या उद्देशाने 36ते 40 वयातच सैनिक सेवानिवृत्त होतात. आपल्या आयुष्याचा गाभा तारूण्य जवानी देशावर  कुर्बान करतात म्हणूनच या सैनिकांचे पुनर्वसन करणे शासन प्रशासनाचे आद्यकर्तव्य आहे. 


       कारण याच वेळेत सैनिकांची परिवारिक जिम्मेदारी दुपटीने वाढलेली असते .पगार बंद होते व पेन्शनवर मुला-मुलींचे शिक्षण लग्न याचा भार पडतो. माजी सैनिकांचे जीवन मान उंचावेल, सुसह्य व्हावे याकरिता अनेक उपाय योजना केल्या जातात . सैनिकांच्या परिवारासाठी CSD कॅन्टीन स्टोअर डिपारमेंट च्या माध्यमातून घरगुती सामानात सवलत मिळते ECHS एक्स सर्विसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ सर्विस च्या माध्यमातून वैद्यकीयउपचार ऑपरेशन औषध गोळी मोफत दिल्या जाते .परंतु ध्वजदिन निधी संकलनात तून KSB केंद्रीय सैनिक बोर्ड जिल्हा सैनिक बोर्ड कडून शैक्षणिक कोर्सेस फीज शिष्यवृत्ती दरवर्षी मुला मुलींना दिल्या जाते. मुलींचे लग्नास आर्थिक मदत जवळजवळ पंचेचाळीस योजनातून आर्थिक मदत सैनिक परिवारास मिळते. 

       पहिली ते दहावी दहावी ते बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन चे ठराविक आर्थिक मदत सैनिक पाल्यास मिळतात जे सैनिक व सैनिक कागदपत्रे पूर्ण करून ऑनलाइन करतात, त्यांनाच तपासणीनंतर आर्थिक मदत मिळते .सर्व क्षेत्रातून ठरवलेल्या टार्गेट पेक्षा जास्त प्रतिसाद ध्वजनिधी स मिळते कारण भारतीय सैन्याची प्रतिमा प्रत्येक  देशवासीयांच्या मनामध्ये उजळ आणि स्वच्छ आहे व देशाची अखंडता व एकता अबाधित रहावी असे प्रत्येक भारतीयांचे मत आहे आणि यातूनच देशभक्तीची लहर झळकते .जय जवान   जय किसान जय हिंद