वंदना गवई जिल्हा प्रतिनिधी
लोकशाहि मराठी पत्रकार संघाच्यावतीने प्रशांत जैवाळ यांचा सत्कार
चिखली : भारत विकास प्रबोधिनी आणि शांती आनंद एज्युकेशन अॅण्ड सोशल वेलफेअर सोसायटी या संस्थेच्या वतीने नाशीक येथे दि.१२ डिसेंबर २०२१ रोजी पार पडलेल्या भारतरत्न मदर टेरेसा अवॉर्ड 2021 या पुरस्कार खोज मास्टर चे बुलडाणा जिल्हा प्रतिनीधी तथा लोकशाहि मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत जैवाळ यांना मिळाल्याबद्दल त्यांचा छोटेखानी सत्कार सोहळा लोकशाहि मराठी पत्रकार संघाने दिनांक १८ डिसेंबर रोजी आयोजित केला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वृत्त नायकचे संपादक योगेश शर्मा हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विरपीता भारत पवार होते. प्रमुख उपस्थीतीत शेतकरी नेते नितीन राजपुत, नरेंद्र जाधव, जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे, तालुका अध्यक्ष संदिप सावळे पाटिल हे होते.
यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणाची सुरवात करण्याअगोदर योगेश शर्मा यांनी शहीद कैलास पवार यांचे वडील भारत पवार यांच्या पायांना स्पर्श करत देशाला वीर सुपुत्र देऊन सर्वोच्च कार्य करण्याची प्रेरणा स्व. कैलास पवार यांना दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पू. ल. देशपांडे यांचे वाक्य "आज जगामध्ये ज्यांचे पाय धरावे असे पाय मिळत नाही ते लाभले इथे, ते पाय धरले तर काय वावग..!" म्हणत आपल्या भाषणाची भावनिक सुरवात केली.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याने प्रत्येक पत्रकाराने शोध पत्रकारीता करुन नवनविन विषय सामोरे जाऊन समाजभीमुख तसेच दबावतंत्राचा वापर करण्याकरिता पत्रकारिता न करता जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व राष्ट्रहितासाठी पत्रकारीता करावी असे योगेश शर्मा यांनी सांगीतले.
यावेळी सर्व मान्यवरांचे समयोचीत भाषणे होऊन सत्कारमुर्तींचा सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालूका उपाध्यक्ष कु. वंदनाताई गवई तर आभार प्रदर्शन तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र घुबे यांनी केले. यावेळी कु. उमाताई सुरडकर, सौ. रूपालीताई डोंगरदिवे, कल्पनाताई केजकर, सौ. लक्ष्मीताई गीर्हे, सतीषराजे पैठणे, रवी मगर, शेख अजहर, दिलीप हतागळे, शेख कौसर, राजीव जाधव, राधेशाम काळे, समाधान वानखडे, सिध्दार्थ वानखडे, विनोद सोनटक्के, परमेश्वर इंगळे, संकेत जाधव, पवन गवई, मुकेश इंगळे, सुरज अवसरमोल, रघुनाथ गवई यांच्यासह लोकशाहि मराठी पत्रकार संघ चिखलीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.