आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार
कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त ब्लँकेट वाटप.
येथील छत्रपती शिवाजी महाराज निसर्ग सेवा समितीच्या वतीने जवळा येथील गरजू व्यक्तींना कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त ब्लँकेट वाटप करण्यात आले. संत गाडगेबाबा आपल्या खराट्याने दिवसभर गाव स्वच्छ करायचे आणि रात्री गावागावात किर्तन करून लोकांचे मन साफ करायचे. आयुष्य भर ते लोकांसाठी समाजासाठी कणकण झिजत राहिले. कीर्तनातून जनजागृती करत राहिले. भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, उघडयांना वस्त्र, गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंध अपंग रोगी यांना औषधोपचार, पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय, दुःखी निराधारांना मदत इत्यादी. मोलाचे उपदेश त्यांनी केले .
त्यांच्याच विचाराचा एक छोटासा प्रयत्न म्हणून छत्रपती शिवाजी महाराज निसर्ग सेवा समितीने गरजू व्यक्तींना कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त ब्लँकेट देऊन त्यांची पुण्यतिथी साजरी केली यावेळी समितीचे नरेश रामटेके, आसिफ शेख, सुहास पंचभाई, ज्ञानदीप चोपडे, आशिष ढाकुलकर, गणेश धनोडे, उमेश चावरे, राजेश्वर शेलोकार, गौरव जाधव, मनोज जाधव, गुलमोहम्मद पठाण, अमोल शिस्तकार, गणेश एकंडवार रुपेश आडे, निलेश कोटमकार, शेख साबीर, राहुल खंदार, शंकर कुरर्मेलवार आदी समितीचे सदस्य उपस्थित होते.