Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पाचोरा जामनेर पी जे रेल्वे बंद पडू देणार नाही - खलील देशमुख

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

ब्रिटिश कालीन ऐतिहासिक पाचोरा जामनेर पी जे रेल्वे बंद पडू देणार नाही त्यासाठी प्रसंगी व्यापक जनआंदोलन छेडले जाईल असे प्रतिपादन पी जे रेल्वे बचाव कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख ते पहुर येथील कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते ते म्हणाले शंभर वर्षापूर्वी ब्रिटिशांनी सुरू केलेली पाचोरा जामनेर  पी जे रेल्वे बंद करण्याचा घाट केंद्र शासनाने घातला असून पीजे रेल्वेचा आशा गुंडाळण्याचा विश्वास वृत्तामुळे पाचोरा व जामनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे गोर गरीबाची सर्वसामान्य प्रवाशांची जीवनदायिनी समजली जाणारी पाचोरा जामनेर पी जे रेल्वे बंद करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासकीय स्तरावरून केल्या जात आहे डिझेल बंद करणे.
         कर्मचाऱ्यांच्या अन्यत्र बदली करणे यामुळे सदर रेल्वेमार्गाच्या आशा गुंडाळळल्या जात आहे हे स्पष्ट झाल्याने ऐतिहासिक पाचोरा जामनेर पी जे रेल्वे चे संवर्धन करून नव्याने सादर मार्ग करून करावा त्याचबरोबर सदर मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करावे यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जातील प्रसंगी व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा पाचोरा जामनेर रेल्वे बचाव कृती समितीने दिला आहे पाचोरा जामनेर मार्गाचे खरोखरच ब्रॉडगेज मध्ये रूपांतर होणार असेल तर आम्ही सहकार्य करायला तयार आहोत मात्र ब्रॉडगेज च्या नावाखाली नावाखाली जर सदर रेल्वे बंद करण्याचा घाट केंद्र शासन करत असेल तर मात्र आम्ही स्वस्त न बसता व्यापक जन आंदोलन छेडू असे खलील देशमुख यांनी दिला.


पहुर सह जामनेर शेंदुर्णी वरखेडी आदी ठिकाणी कृती समिती यांनी बैठका घेतल्या गुरुवारी सायंकाळी हूर येथील ईश्‍वरबाबूजी पण संस्थेच्या हॉलमध्ये पाचोरा जामनेर पी जे रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली या बैठकीत प्रसंगी माजी कृषी सभापती जिल्हा परिषद जळगाव प्रदीप लोढा शिवसेना तालुका प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे रेल्वे सेंटर बोर्डाचे सदस्य रामेश्वर पाटील आरोग्यदूत अरविंद देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख शैलेश पाटील यांनी आपणास सर्व सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन ाप्रसंगी दिले यावेळी ईश्‍वरबाबूजी पतसंस्थेचे चेअरमन भास्कर दादा पाटील उपसरपंच श्याम सावळे माजी उपसरपंच रवींद्र मोरे ग्रामपंचायत सदस्य ईका पैलवान ईश्वर बारी शरद पांढरे राजू पाटील सर किरण पाटील यांच्यासह रेल्वे बचाव कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते