प्रतिनिधी बुलढाणा
महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, शेतकऱ्यांनी शासकीय मका खरेदीचा लाभ घ्यावा आमदार राजेश एकडे.
यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन घेतले आहे,नांदुरा व मलकापूर येथे शासकीय मका खरेदी सुरू करावी अशी तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांची मागणी होती.मका उत्पादकांची रास्त मागणी लक्षात घेता आज नांदुरा येथील खरेदी विक्री संघा मार्फत बालाजी जिनिंग व नांदुरा अग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी लि.नांदुराच्या वडी गोडाऊन मध्ये व मलकापूर (बेलाड) येथे खरेदी विक्री संघ मलकापूर यांच्या वतीने आयोजित खरेदी शुभारंभ मलकापूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते काटा पूजन करून मका खरेदीचा शुभारंभ झाला.महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी शासकीय मका खरेदीचा लाभ घ्यावा,अशी भावना यावेळी आमदार राजेश एकडे यांनी व्यक्त केली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुरा चे मुख्य प्रशासक श्री.पदमभाऊ पाटील,नांदूरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री.वसंतरावजी भोजने,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोहनजी पाटील ,श्री.अनिलभाऊ घनोकार, श्री.मोहन गावडे, श्री.बाळू पाटील, सौ.सूनिताताई गोंड, युवा सेनेचे श्री.ईश्वर पांडव, नायब तहसिलदार चव्हाण साहेब,पेठकर साहेब, सूर्यवंशी साहेब ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी श्री.अमोल पाटील,श्री.संजूभाऊ पाटील,श्री.सागर वानखडे,नांदुरा अग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी लि.नांदुरा चे श्री.अमोल धामोडकर,श्री.सागर पाटील,श्री.शिवजी ताठे,तसेच मलकापूर येथे खरेदी विक्री संघाच्या वतीने आयोजित मका खरेदी शुभारंभामध्ये मलकापूरचे तहसीलदार श्री.राजेन्द्र सुरडकर साहेब,A O श्री.देशमुख साहेब,श्री.श्रीकृष्ण खापोडे,श्री.सूर्यभान कवडे, श्री.विलास हरिभाऊ पाटील,श्री. उमरावसिंह राजपूत,श्री.सुरेश पाटील,श्री.सुरेश पाटील धरणगाव,श्री.बाळू पाटील,श्री.प्रल्हाद ढोले,श्री.लीलाधर पाटील,श्री.जयपाल राजपूत,मार्केट कर्मचारी श्री.भगवान जाधव,श्री.सुनील चोपडे,श्री.प्रशांत तळोले व शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.