Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भोपळे महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा

Responsive Ad Here

जितेश कारीया

             हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमारजी  भोपळे हे होते. तसेच प्रमुख उपस्थितीत प्राचार्या कु.रजनी वालोकार,सामाजिक कार्यकर्ते सतीश राऊत, संस्थेचे संचालक स्नेहल भोपळे, ज्येष्ठ शिक्षक संतोषकुमार राऊत हे होते.याप्रसंगी  कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांनी  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन केले.



           शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे दिली. प्रा.निखिल भड तसेच प्राचार्या रजनी वालोकार मॅडम यांनी डॉ बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.  कार्यक्रमाचे संचालन वर्ग दहावीच्या विद्यार्थिनी कु.किमया मनीष गिऱ्हे व सय्यदा लायबा फिरोजअली मिरसाहेब  तर आभारप्रदर्शन कु.सौम्या दिलीप  बाळापुरे यांनी शिक्षक प्रशांत भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली  केले. यावेळी शाळेतील  शिक्षक रंजित राठोड,निलेश गिऱ्हे,गणेश खानझोडे, कु.छाया गिरी, कु.पदमा वडतकर,स्वप्निल गिऱ्हे, सुनील वाकोडे, निलेश कासोटे,निखिल भड,अमोल दामधर व शिक्षकेत्तर कर्मचारी रामकृष्ण भड,अंबादास चाफे,गजानन पवार, निलेश दांडगे यांची उपस्थिती होती.