Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महापरिनिर्वाण दिन साजरा

Responsive Ad Here


भीमराव चाटे देऊळगाव राजा

 आज सहा डिसेंबर ला माजी सैनिक मित्र फाउंडेशन कृत महाराष्ट्र सैनिक करिअर अकॅडमी देऊळगाव राजा येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला सर्वप्रथम मधुकर रंजन वाघ यांनी दीपप्रज्वलन केले उपासिका आशा विजय काकडे यांनी फुलांची रांगोळी काढली पुनर नियुक्त माजी सैनिक संघटना तालुका अध्यक्ष श्रीमंत पांडव यांनी पुष्पहार घालून बाबासाहेबांच्या प्रतिमे चे पूजन केले .

महाराष्ट्र सैनिक करिअर अकॅडमी संचालक इन्स्पेक्टर मधुकर आश्रुबा वाघ यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी विचार मांडले सैनिक माजी सैनिक मित्र शरद जायभाये सर रमेश बर्डे सर श्री विष्णू घुले समाधान वाघ सर प्रथमेश परमेश्वर वाघमारे प्रकाश बक्षी सर व सर्व विद्यार्थी मित्र कार्यक्रमास हजर होते सर्वांनी त्रिशरण व पंचशील घेतले सैनिक करियर एकेडमी दत्तकपुत्र अविनाश काकडे यांनी भीम गीते गायली शेवटी सैनिक मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष भीमराव महादेव चाटे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले