जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहुर पेठ येथील जि प शाळेत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, पहिला व दुसरा कोविशिल्ड डोस साठी नागरिकांची गर्दी केली होती. गावातील आशा सेविका,अंगणवाडी सेविका,मदतनिस,शिक्षक , ग्रामपंचायत कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी डॉ संदीप कुमावत, डॉ जितेंद्र जाधव,एस पी पवार,एम पी तागवले, बी बी काटकर, आर एन वाणी ,आशा सेविका शोभा बारी,रेहना पिंजारी, मंगला दातीर, अशा घाटे,सुलोचना बारी,सरिता पाटील,विजया जाधव,अर्चना पाटील,वैशाली घोलप, सरिता पांढरे, जि प केंद्र शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र खोडपे उपशिक्षक,गणेश राऊत,मिलिंद तायडे यांनी परिश्रम घेतले.
लसीकरणाकडे शिक्षकांची पाठ_बीडीओ यांच्या आदेशाला केराची टोपली
सदर कॅम्प साठी जि प शाळांचे 100% शिक्षक, आशा सेविका, आरोग्य सेवक यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे बी डी ओ ज्योती कवडदेवी यांनी आदेशीत केलेले होते. परंतू सदर कॅम्प कडे नियोजन स्थळावरील शिक्षकांशिवाय कुणीही फारसे फिरकले नाहीत त्यामुळे धांदल उडाली पहुर पेठ अंतर्गक्त 5 ते 6 शाळा 30 ते 35 शिक्षक बांधव आहेत, त्यापैकी क्वचितच शिक्षकांनी पुर्णवेळ हजेरी दिली. पहुर पेठ गाव लोकसंख्येने मोठे असल्याने लसीकरणासाठी मोठ्याप्रमानात गर्दी झालेली होती. शिक्षकांनी या सामजिक कामात योगदान देणे अपेक्षित असतांना बी डी ओ यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याने सर्वत्र पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अशा शिक्षकांवर जामनेर पंचायत समिती गटविकास अधिकारी काय कारवाई करणार गावाचे लक्ष लागून आहे
कार्यक्रम स्थळी सरपंच नीता पाटील,उपसरपंच श्याम सावळे, रामेश्वर पाटील ,माजी जि प सदस्य राजधर पांढरे, ग्रा प सदस्य रवींद्र मोरे, शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे, शरद बेलपत्रे, समाधान पाटील शांताराम गोंधनखेडे सोमनाथ बेढे आदी पदाधिकारी उपस्थित होते
यावेळेस शिक्षकांनी गैरहजेरी दाखविल्यामुळे गावातील सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे योगेश मोरे दीपक मोरे सनी मोरे रोहित मोरे आनंद मोरे तुषार मोरे या तरुणांनी शिबिरास सहकार्य केले त्यामुळे या सर्व तरुणांचे सर्व गावातील राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले या लसी शिबिरामुळे गावातील पाचशे नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला