Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिक्षण सभापती बादशाह खान व न.प सदस्यांनी चिमुकल्यांना पुष्पगुच्छ देऊन शाळेत केले स्वागत

Responsive Ad Here

मो.असलम परवेज:लोणार


"न.प ऊर्दू पूर्व माध्यमिक शाळा लोणार येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न"


              महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्रातील वर्ग 1 ते 12 पर्यंत चे सर्व शाळा नियमितपणे सुरू झाले. सुमारे 18 महिन्यापासून शाळा बंद होत्या चिमुकल्यांनी शाळेचे तोंडही पाहिलेन होते.  सर्व विद्यार्थ्या मध्ये आपली शाळा कधी सुरू होणार? याबाबत अतिउत्साह होती. आता 1 डिसेंबर रोजी शाळेचा घंटा वाजला आणि सर्व विद्यार्थी आनंदाने शाळेत पोहोचले. शाळेत येताच शाळा या चिमुकल्यांना पाहून गालात हसली. तब्बल 18 महिन्यानंतर या मातेला आपले लाडले भेटले, असे वाटत होते. दुसरीकडे स्थानिक नगर परिषदेच्या उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती नूर मोहम्मद खान उर्फ बादशहा खान व त्यांची नगरपालिकेची टीमने ने या चिमुकल्यांना पुष्पगुच्छ देऊन शाळेमध्ये स्वागत केले व आता शाळा बंद पडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली. 

     पुष्पगुच्छ देऊन शाळेमध्ये स्वागत होत असल्याचे पाहून सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढला होता. मुख्याध्यापक शेख इस्माईल शेख हनिफ आणि शेख कदीर जैनोद्दीन व सर्व शिक्षक व शिक्षिकांनी सुद्धा या विद्यार्थ्यांना पुष्प देऊन शाळेमध्ये स्वागत केले. नगर पालिकेच्या सर्व सदस्यांनी  प्रत्येक वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिले. दिवसभर शाळेमध्ये हसता खेळता वातावरण निर्माण झाला.           
      या वेळी नगर परिषद अध्यक्षा पूनम म.पाटोळे, उपाध्यक्ष बादशहा खान पठाण,आरोग्य सेविका फरजाना बी शेख रऊफ, न.प. सभापती आबेद खान,सभापती तौफिक कुरेशी, गटनेते भूषण भाऊ मापारी, नगर सेवक संतोष भाऊ मापारी, रमजान गवळी, ज्योत्सना गुलाब सरदार, साहेबराव पाटोळे, प्राध्यापक गजानन खरात पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष शेख समद शेख अहमद इत्यादिंची उपस्थिती होती.