Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नागपूर तुळजापूर महामार्गावर ट्रक व ट्रॅक्टरचा भीषण अपघात.

Responsive Ad Here

आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार जवळा


अपघातात एक ठार तर अन्य दोन किरकोळ जखमी.


जवळा नजीकच्या तरोडा गावाजवळील चौफन पुलाजवळ(गजानन काळे) यांच्या शेताजवळ उसाने भरून जाणाऱ्या डबल ट्रॉलीच्या ट्रॅक्टरला ट्रकने मागून धडक दिल्याने ट्रॅक्टर वरील लेबर हा जागीच ठार झाला असून ट्रॅक्टरची एक ट्रॉली एका जागेवर तर दुसरी ट्रॉली व मुंडके शंभर मीटर दूर ट्रकच्या धडकेने फेकले गेले आहे व ट्रकचे सुद्धा भरपूर नुकसान झालेले आहे.


    रविवार ला रात्री ११ वाजताच्या दरम्यान हिंगोली येथील ट्रॅक्टर क्रमांक एम एच ६४९४ हा वाई मेंढी येथील इंगोले यांच्या शेतातून ऊस भरून मंगरूळ येथील साखर कारखान्यावर जात असताना जवळा नजीकच्या तरोडा गावाजवळ नागपूर तुळजापूर रोडवर पाठीमागून ट्रक क्रमांक एम एच २६ बी.ई. ३३६२ या ट्रकने धडक दिल्याने ट्रॅक्टरची एक ट्रॉली पूर्णपणे तुटून पडली .

   त्यामधील ऊस हा रस्त्याच्या मधोमध पडला व दुसरी ट्रॉली व मुडके १०० मीटर दूर जाऊन पडले यात लक्ष्मण राठोड राहणार खेड तालुका हिंगोली या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन जण जखमी असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शी नी दिली  व ट्रक आर्णी पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार संजय भारती व अरुण पवार करीत आहे.