Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जवळा येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी

Responsive Ad Here

आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार  जवळा 

     आर्णी तालुक्यातील जवळा येथे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. अंधश्रद्धेने बुरसटलेल्या समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून प्रकाशाच्या नव्या वाटा दाखविणारे प्रबोधनकार संत गाडगेबाबा निरोगी जीवनासाठी अस्वच्छता संपवून स्वच्छतेचा संदेश आयुष्यभर देणारे कर्मयोगी अन्याय, आनीती ,अत्याचार याविरूद्ध पेटून उठणारे कर्तव्यनिष्ठ एक वेळ उपाशी राहा पण मुला-बाळांना शिकवा ही कळकळीची विनंती जनतेला करणारे थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा(संत गाडगेबाबा हे चालते-फिरते व्यासपीठ होते) यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

      यावेळी संतोष काळे, विनोद पाटील, कैलास पिसे, बालू पिसे, अनिल चौधरी, बंडू नागापुरे, धीरज गावंडे, अनिल पिसे, गणेश एकंडवार, भारत काळबांडे, सतीश धाये, सुरेश निकम, बालू कोंपलवार, दिनेश पिसे, गजानन धोंगडे, किशोर पिसे, शुभम पिसे, पिंटू चावरे, विषाल धोंगडे, शिवा वरुडकर, आसिफ शेख, गणेश धनोडे, शुभम पिसे, दत्ता गारशेलवार समस्त समाज बांधव व गावकरी उपस्थित होते