Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरचा भीषण अपघात

Responsive Ad Here

 आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार जवळा

जवळा बायपासवर काका पुतण्याचा मृत्यू

 :
        आर्णी तालुक्यातील जवळा येथील गवणा रोड जवळील उड्डाण पुला खाली भीषण अपघात घडल्याची घटना २८ तारखेला सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली आहे यात दोन जण जागीच ठार झाले आहे यात ऐक १९ वर्षाच्या तरुणाचा समावेश असून ऐक २ वर्षीय बालक जागीच ठार झाले आहे.जवळा गावातील राहुल अरुण जवके हा एम एच २९ बी पी ६०२५ या ट्रॅक्टरवर बसून त्याच्या पुतण्याला ट्रॅक्टर वर घेऊन शेतात रोटावेटर करण्याकरिता जात असताना राष्ट्रीय महामार्ग वरून शेतात जात होता त्या दरम्यान ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने व अचानक ट्रॅक्टरचा वेग वाढल्याने ट्रॅक्टर हा रस्त्याच्या काठेला शेताच्या बांधावर जाऊन पलटी झाला.



         यात जवळा येथील राहुल अरुण जवके वय 19 वर्ष व देऊ स्वप्नील जवके वय २ वर्ष या दोघांचा ट्रॅक्टर खाली दबून जागीच मृत्यू झाला हे दोघेही सगे काका-पुतणे होते यावेळी जवळा बायपासवर बघ्यांची एकच गर्दी झाली होती ही माहिती आर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांना मिळताच ते शासकीय वाहन घेऊन आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतकाना शव विच्छेदन करण्या करिता आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे या घटनेने सर्व जवळा गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे पुढील तपास आर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार संजय भारती,जमादार अरुण पवार करीत आहे.