Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जुनी पेंशन संघर्ष समितीच्या आंदोलकांना वर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्याबाबत निवेदन

Responsive Ad Here

मोहम्मद असलम परवेज


    सिल्लोड-  दिनांक 21 डिसेंबर 2021 पासून पडघा कल्याण येथून जुनी पेंशन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने लोकशाही सनदशीर मार्गाने पेंशन मार्च काढण्यात आला होता, या आंदोलनाकाची बाजू ऐकून न घेता  दिनांक 24 डिसेंबर रोजी जकात नाका येथे पेंशन मार्च अडवून पेंशन मार्च रोखण्याचा प्रयत्न केला आणि ठाणे येथील नवघर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले ही लोकशाहीला काळिमा फासणारी गोष्ट आहे. तरी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने  फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे  यांना विनंती करण्यात आली की आंदोलकावर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेयावे व महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करण्यात यावी.     

                
                    इमेल आणि व्हाट्सएप द्वारे ही  मांगणी करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने आज सिल्लोड येथे राज्याचे ग्रामविकास व महसूल मंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या राहते घरी भेट घेण्यात आली व त्यांना याबाबत विनंती करण्यात आली की त्या सर्व 12 आंदोलकांवर नोंद झालेले गुन्हे तात्काळ मागे घावे. शिष्टमंडळाला उत्तरं देतांना ना.अब्दुल सत्तार 
यांनी आश्वासित केले की सर्व गुन्हे वापस घेण्यात येईल. हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी त्यांचे आभार मानले. या वेळी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन च्या शिष्टमंडळात संस्थापक सचिव शेख शब्बीर, राज्य उपाध्यक्ष शफीक पठाण, कायदेशिक सल्लागार ऍड.इरफान खान, सिल्लोड चे तालुकाध्यक्ष शेख जफर आदींची उपस्थिती होती.