Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सभापतीच्या गावातीलच विकास काम रेंगाळले

Responsive Ad Here

आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार


 कंत्राटदार मनमानी करत असल्याचा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचा आरोप


        जवळा:- आर्णी तालुक्यातील देवगाव येथॆ खासदार निधीतील खनिकर्म योजनेमधून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम २०१७ मध्ये मंजुर झाले होते पण कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे सदर काम चार वर्षापासून थंडबस्त्यात आहे, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांनी राहिलेले काम सुरू करा अशी विचारणा केली असता कंत्राटदाराकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांनी आरोप केला आहे.आर्णी तालुक्यातील देवगाव हे गाव देवगांव प्रकल्पामुळे १९८२ साली पुनर्वसन झाले असून,खडकावर वसलेले आहे, त्यामुळे येथील पाणी पातळी खूप खोलवर आहे,देवगाव येथे दरवर्षी मार्च च्या आठवड्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते,अशातच २०१७ साली पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम मंजूर झाले व काम सुरू करण्यात आले होते,आता पाणीटंचाई पासून मुक्तता मिळणार म्हणून देवगाव येथील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, पण गेल्या चार वर्षापासून सदर टाकीचे काम थंडबस्त्यात असून आज पर्यंत पूर्णत्वास झाले नाही म्हणून देवगाव येथील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे, तरी सदर टाकीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून ग्रामवासियांना दिलासा द्यावा,अशी मागणी होत आहे.

 देवगाव मध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम चार वर्षापासून थंडबस्त्यात



प्रतिक्रिया 
कंत्राटदाराशी माझं बोलणं झालेलं आहे,सदर टाकीचे राहिलेले काम आठ ते दहा दिवसात सुरू करण्यात येईल,सदर कंत्राटदाराला कामाची मुदत संपल्यामुळे दंड लावण्यात आला,कंत्राटदाराला आणखी १ एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे,एका महिन्याच्या आत टाकीचे राहिलेले काम पूर्ण करण्यात येईल 
सुनिल चव्हाण उपअभियंता पाणीपुरवठा  जिल्हा परिषद,यवतमाळ


मी स्वतः जिल्हा परिषद येथील पाणीपुरवठा उपअभियंता सुनिल चव्हाण यांच्याशी विचारणा केली असता,सुनिल चव्हाण यांनी सांगितले की मी सदर कंत्राटदाराला वारंवार सूचना केल्या पण सदर कंत्राटदाराने वेळकाढूपणा केला,आणि सदर कामाची मुदत संपल्यामुळे दंड लावून कारवाईसुद्धा केली.

कवडू जाधव उपसरपंच,ग्रामपंचायत देवगाव

आमच्या गावामध्ये दरवर्षी मार्च महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते,पिण्याच्या पाण्यासाठी रात्री-बेरात्री गावानजिकच्या शेतातील विहरीवर पायपीट करावी लागते आम्ही ग्रामस्थ महिला गेल्या चार वर्षापासून ग्रामपंचायत नळ योजनेच्या प्रतिक्षेत आहे पण गेल्या चार वर्षापासून टाकीचे काम पूर्ण झाले नाही आणी आम्हाला दिलासा मिळाला नाही

ग्रामस्थ महिला देवगांव