आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार जवळा
जवळा मध्ये लहान बालिकेला पुन्हा अफरण करण्याचा प्रयत्न. गावात देशी दारू विक्री चालू आहे. रस्त्यावर मिळते दारू.
तालुक्यातील जवळा येथील गावकरी नागरिकांनी पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांना जवळा येथील पोलीस चौकीवर नियमित पोलीस कर्मचारी देण्यात यावे या मागणीसाठी निवेदन दिले. जवळा येथे पोलीस चौकी असून त्या चौकीवर कोणीही पोलीस कर्मचारी हजर राहत नाही त्यामुळे गावात शांतता सुव्यवस्था चा प्रश्न उपस्थित होत आहे मागील काही दिवसांपासून गावात भांडण तंटा ही जास्त प्रमाणात वाढले आहे तसेच अवैध धंदे सुध्दा खुलेआम चालू आहे त्यात मटका, अवैध दारू विक्री केली जात आहे यावर कुठेतरी अंकुश लावावा अशी गावकरी नागरिकांची मागणी आहे व दोन दिवसा आधी आर्णी तालुक्यातील कुरा डूमणी येथील ऐका तीन वर्षीय बालिकेचे अपहरण झाले तसाच प्रकार २१ तारखेला मंगळवारी ७ वाजताच्या दरम्यान जवळा येथे घडली आहे.
| पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांना जवळा येथील गावकऱ्यांचे निवेदन. |
जवळा येथील ग्रामपंचायत सदस्य अमोल ठाकरे यांच्या ७ वर्षाच्या मुलीला देखील ऐका अज्ञात महिलेने हात धरून नेण्याचा प्रयत्न केला सुदैवाने यात बालिकेचे अपहरण गावातील काही सुज्ञ नागरिकांन मुळे टळले मात्र अपहरण करणारी महिला पळून गेली त्यामुळे जवळा गावात शांतता सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जवळा पोलीस चौकी ला २ पोलीस कर्मचारी नियमित द्यावे व रात्रीची पोलीस गस्त वाढवावी जेणेकरून अश्या घटना होणार नाही यासंदर्भात पोलीस स्टेशन आर्णी येथे निवेदन देण्यात आले आहे .
यावेळी बाबाराव खोडनकर उपसरपंच जवळा,धीरज गावंडे ग्रा.प.सदस्य,संजय नागापुरे ग्रा.प.सदस्य, अतिश मुजमुले ग्रा.प.सदस्य, अमोल ठाकरे ग्रा.प.सदस्य,आषिफ शेख पत्रकार,गणेश एकंडवार पत्रकार,अमोल ठक पत्रकार,विशाल इंगोले पत्रकार,गणेश धनोडे पत्रकार,राजेश्वर शेलोकर,कैलास एकंडवार,देविदास आडे,अमजद पठाण,लाली राठोड आदी गावकरी उपस्थित होते.