Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

संत चोखोबा जन्मस्थळी मेहुणा राजा नगरीमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांचे अभिष्टचिंतन सोहळा व सैनिक गुणगौरव व सन्मान सोहळा पार पडला.

Responsive Ad Here

 भीमराव चाटे दे राजा 

            खासदार प्रतापराव जाधव साहेब यांनी संत चोखोबा महाराजांचे दर्शन व पूजन केले ,व मंचावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. नंतर देशसेवा केलेल्‍या देशभक्त सैनिकांचा पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सत्कार केला. व घरोघरी जाऊन कोरूना काळामध्ये जीवाची पर्वा न करता सेवा देणार्‍या आशा स्वयंसेविका यांचा सत्कार खासदार जाधव साहेबांनी केला. व उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार मध्ये उद्योग क्षेत्रावर साखर कारखाना चालक समाधान डोईफोडे,  सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जनजागृती व विषमुक्त शेती करणारे व विषमुक्त अन्न व धान्य विक्री करणारे शेतकरी कैलास बंगाळे देऊळगाव राजा, मिरची उत्पादक साठ लाखाचे उत्पादन घेणारे दादाराव पाटील चेके ,IIT संशोधक इंजिनियर निखिल दत्तात्रय आरमाळ, देऊळगाव राजा तालुक्यातील द्राक्षबागायतदार सुदर्शन चित्ते,  देऊळगाव राजा तालुक्यातील पहिले नंबर एकचे सफरचंद बागायतदार सीताफळ ,रामफळ, हनुमानफळ, चिकू, पेरू ,आंबे ,बोरी ,जांभळी ,संत्री ,मोसंबी सर्व जातीची फळे ऊस लागवड करणारे व पोल्ट्री फार्म बकरी पालन व्यवसाय करणारे श्री रघुवीर भाऊराव सोनवणे सर मेव्हणा राज्यातील एकमेव उत्कृष्ट शेतकरी यांचा सत्कार झाला .कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सेवा देणारे डॉक्टर मांटे  साहेब यांचा सत्कार खासदार साहेबानी केला मेहुणा राजा तील 27 पोलीस बांधव आतील ज्येष्ठ जमादार अशोक संभाजी चाटे साहेबांचा सत्कार खासदार साहेबांनी केला सेवारत व सैनिक निलेश हरिचंद्र सोसे सेवारत सैनिक संदीप ज्ञानदेव काकडे सैनिक मित्र फाऊंडेशनचे अध्यक्ष भीमराव महादेव चाटे संचालक महाराष्ट्र सैनिक करियर एकेडमी देऊळगावराजा यांचा सत्कार माजी आमदार शशिकांत खेडेकर साहेब व आयोजक दादाराव खारडे साहेब यांनी केला.

         गुणवंत विद्यार्थिनी कुमारी स्मिता वसंता मांटे नीट परीक्षेमध्ये 576 मार्क कुमारी ऋतुजा गणेश डोईफोडे सिनगाव 550 मार्क कुमारी स्नेहल जायभाये दगडवाडी 670 मार्क घेतलेल्या मुलींचा सत्कार करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाचे आयोजक दादाराव भगवानराव खारडे शिवसेना तालुकाप्रमुख यांचे भाषण झाले नंतर माजी आमदार शशिकांत खेडेकर साहेब यांनी विचार पीठावरून आपले विचार मांडले संत चोखामेळा जन्मस्थळ यांची अवस्था काय होती व आज स्थिती काय आहे पाच कोटी निधी मंजूर करण्यासाठी केलेले प्रयत्न 50 लाखाची झालेली कामे आणि साडेचार कोटी निधी ची मिळालेली मंजुरात याविषयी सांगितले संत चोखा सागराच्या बाजूने दहा एकर जमिनीवर पर्यटन विभागाकडून टेकडी सुशोभित करून नाव काय आणावे व जागतिक दर्जाचे पर्यटन स्थान व्हावे असे प्रयत्न चालू आहे असे शशिकांत खेडेकर साहेब म्हणाले माजी सैनिकांना देवळगावराजा मध्ये जागा उपलब्ध करून निधी मंजूर करण्याचे पाठपुरावा सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे पाटील यांच्याकडे केल्याचे सांगितले शेवटी माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब यांनी आपले विचार मांडले संत चोखोबा महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या या भूमीत मिळालेले आशीर्वाद व सहयोग आम्हाला उपयोगी पडेल व प्रेरणा मिळेल असे म्हणाले  सैनिकांसोबत सर्वांचे स्वागत करणे आद्य कर्तव्य समजतो मी सैनिकांचे जीवन मान प्रत्यक्षात जवळून पाहिलेले आहे 24 घंटा मध्ये ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता प्रत्येक चार तासाला ड्युटी करणारे सैनिक दिनरात देसी सीमेवर तत्पर उभे आहेत.

        म्हणून आम्ही येथे निवांत झोपू शकतो त्यांची कुर्बानी आणि बलिदान हे खूप मोठे आहे सैनिकाच्या जीवन मनावर खासदार प्रतापराव जाधव साहेबांनी बारकाईने प्रकाश टाकला त्यानंतर कोणाच्या काळात जीवाची परवा न करता सेवा देणाऱ्या अशा स्वयंसेवकांनी चांगले काम केल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिला व तुमच्या समस्या व निवेदनावर मी लोकसभेमध्ये चर्चा केली आहे असे सांगितले जगाचा पोशिंदा शेतकऱ्यास आमच्या समस्यांनी घेरलेले असते नोकर भरती नाही व तुम्ही उदासीन राहू नका सकारात्मक हेतूने शेती करा चार महिन्यातून एका दाण्याचे शंभर दाणे करणारी शेती म्हणजे तोट्याची शेती नव्हे मी सुद्धा भूमिपुत्र शेतात जाऊन स्वतःचे काम स्वतः करतो सोयाबीन ला भाव मिळण्यासाठी मार्च महिन्यापर्यंत सोया पेंड आयत थांबवली आहे असे खासदार प्रतापराव जाधव साहेब म्हणाले जे प्रगतिशील शेतकरी आहेत त्यांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे शेती करावी उठले सुटले सावडणे मौत ला लग्नाला ला जाण्यापेक्षा जिथे आपली नोंद होईल तिथेच जावे वेळेचे महत्त्व समजून आपल्या कामात ध्यान द्यावे असे सांगितले व्यासपीठावर शीलाताई शिंपणे धनश्री राम शिंपणे दीपक भाऊ बोरकर राजू नागरे अविनाश डोईफोडे लक्ष्मण मामा पुरा हाड मनोहर चेके सुदाम काकड शांताई सानप आदी मान्यवर उपस्थित होते संत चोखामेळा कमिटीचे पदाधिकारी, मेहुणा राजा गाव वाशी ,ग्रामपंचायत पदाधिकारी कडून हवा तसा प्रतिसाद दिसला नाही बाहेर गाव वरून भरपूर मंडळी आली होती  कार्यक्रम उशिरापर्यंत चालला ठराविक वेळेपेक्षा बराच वेळ झाला जेवणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली