मो.असलम परवेज: लोणार
"२० लाभार्थ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली"
लोणार येथे ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रीय स्त्री आणि पुरूष कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रम राबविण्यात आले. डॉक्टर नितीन तडस जिल्हा शल्यचिकित्सक बुलढाणा आणि डॉक्टर यास्मिन यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया मोहीम दिनांक ३ डिसेंबर २०२१ रोजी राबविण्यात आली. श्री नंदु भाऊ मापारी, अध्यक्ष शिवछत्र मित्र मंडळ व माजी सभापती श्री.आटोले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. लोणार येथे झालेल्या या शस्त्रक्रिया शिबिरामध्ये १८ स्त्री लाभार्थी आणि २ पुरुष लाभार्थीयांच्यावर यशस्वी शात्रक्रिया करण्यात आली .
महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीवर नियंञण ठेवण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात येतो. सध्या या कार्यक्रमासाठीचे अनुदान राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आरसीएच पीआयपी मधून देण्यात येते. लहान कुटुंब साठी समाजात स्वच्छेने दरवर्षीप्रमाणे शासनाच्या वतीने स्त्री आणि पुरुष यांची शासनातर्फे मुक्त नसबंदी केली जाते.
फक्त एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्ञक्रिया करुन घेणा-या दारिद्रय रेषेखालील जोडप्यांसाठी ही योजना १ एप्रिल २००७ पासून सुधारित स्वरुपात लागू करण्यात आली आहे. जोडप्यास एक मुलगी असल्यास व कुटुंब नियोजन शस्ञक्रिया करुन घेतली असल्यास सदरच्या व्यक्तीस रुपये २०००/- रोख व रुपये ८०००/- मुलीच्या नावे राष्ट्रीय बचत प्रमाणपञाच्या स्वरुपात देण्यात येतात. जोडप्यास दोन मुली असल्यास व कुटुंब नियोजन शस्ञक्रिया करुन घेतली असल्यास सदरच्या व्यक्तीस रुपये २०००/- रोख व रुपये ४०००/- प्रत्येक मुलीच्या नावे (एकूण रुपये ८०००/-) राष्ट्रीय बचत प्रमाणपञाच्या स्वरुपात देण्यात येतात.
राज्यात राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, स्ञी रुग्णालये, सामान्य रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये आणि मानांकित खाजगी आरोग्य संस्था यांचे मार्फत केली जाते.
या शस्त्रक्रिया यशस्वी करण्याकरिता वैद्यकीय अधीक्षक डॉ फिरोज शाह , डॉक्टर वानखेडे खामगाव, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय भोसले, डॉक्टर निखिल अग्रवाल, अधीपरीचारक श्रीमती वायल, पडले, घुगे, गोंड, नरवाडे, गवई, बापू देशमुख, नागरगोजे, हटेल, खरे, सागर, अंभोरे, इंगोले, नरवाडे, खरात, भगत इत्यादींनी अंथक परिश्रम घेतले.