बुलडाणा
• कोलवड, वळती, घाटपुरी, शेगांव व लोणार येथील निवासी शाळा
•17 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीचे आयोजन
सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांचे अधिनस्थ जिल्ह्यातील कोलवड, वळती, शेगांव, घाटपुरी व लोणार येथील अनु. जाती व नवबौद्ध मुला-मुलींकरीता शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरीता तासिका तत्वावर शिक्षकांची पदभरती करावयाची आहेत. त्यामध्ये डि.एड व बी.एड पात्रता धारक शिक्षकांच्या एकूण 16 पदांचा समावेश आहे. कोलवड येथील शाळेत तीन, घाटपुरी येथील 3, लोणार येथील 5, शेगांव व वळती येथील शाळेत 3 पदे आहेत. या पदांच्या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन 17 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.
अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळा कोलवड ता. बुलडाणा येथे इयत्ता 6 ते 8 वी साठी सर्व विषयांकरीता एचएससी डि.एड शिक्षक एक, विज्ञान व सामाजिक शास्त्र विषय 9 व 10 वी करीता बीएससी, बी.एड एक व बीए बीएड एक पात्रताधारक अशा तीन शिक्षकांची आवश्यकता आहे. अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळा लोणार ता. लोणार येथे इयत्ता 6 ते 8 वी साठी सर्व विषयांकरीता एचएससी डि.एड शिक्षक दोन, विज्ञान, इंगजी व सामाजिक शास्त्र विषय 9 व 10 वी करीता बीएससी, बी.एड एक, बीए / एमए बीएड प्रत्येकी एक असे एकूण 3, अशाप्रकारे एकूण 5 शिक्षकांची आवश्यकता आहे. अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळा शेगांव ता. शेगांव येथे इयत्ता 9 वी 10 वी करीता सामाजिक शास्त्र विषयासाठी बीए बीएड 1 व गणित विषयाकरीता बीएससी, बीएड 1 असे दोन शिक्षकांची आवश्यकता आहे. अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळा वळती ता. चिखली येथे प्राथमिकसाठी मराठी विषयाकरीता एक, माध्यमिकसाठी मराठीकरीता बीए, बीएड शिक्षक दोन, असे एकूण 3 शिक्षकांची आवश्यकता आहे. या शाळेकरीता इंग्रजी एक, सामाजिक शास्त्रे विषयाकरीता दोन शिक्षक अशाप्रकारे तीन पदे आहेत. त्याचप्रमाणे अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळा घाटपुरी ता. खामगांव येथे इयत्ता 6 ते 8 वी साठी बीएससी/ डि.एड/ बी.एड शिक्षक एक आणि 9 व 10 वी करीता बी.ए /बी.एड, बी.एससी/बी.एड (गणित), बी.ए/बी.एड भाषा पात्रताधारक दोन असे तीन शिक्षकांची आवश्यकता आहे.
या विषयांकरीता घड्याळी तासिकेवर नियुक्ती करण्याकरीता इच्छूक पात्र उमेदवारांनी संपूर्ण माहितीसह अर्ज व कागदपत्रांच्या मुळ आणि छायाप्रतींसह 17 डिसेंबर 2021 रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे उपस्थित रहावे. तासिकेचे मानधन शासन निर्णयातील तरतुदीनुसार देय राहणार आहे. सन 2021-22 करीता तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक असून उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा दावा करणार नाही, असे बंधपत्र लिहून देणे बंधनकारक राहणार आहे. शैक्षणिक पात्रता व अनुभव असणाऱ्या उमेदवारांना तसेच यापूर्वी तासिका तत्वावर या शाळांवर काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.