बुलडाणा
ध्वजदिन निधी संकलन समारोह तथा माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सैनिक कॉम्प्लेक्स, बस स्थानकासमोर, बुलडाणा येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते उपस्थित राहणार आहे.
मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व अवलंबित यांनी उपस्थित रहावे. कार्यक्रमास येताना मास्क लावणे अनिवार्य आहे. तसेच कार्यक्रमासाठी लसीचे दोन डोस घेतलेले असलेल्यांनाच प्रवेश दिल्या जाणार आहे. तरी माजी सैनिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर निंबाजी पडघान यांनी केले आहे.