मो असलम परवेज
लोणार - मुस्लिम समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कमीतकमी नौकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात 5%टक्के आरक्षण देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने करावे तसेच मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी फेलोशिप देण्यात यावे व त्याकरिता स्वातंत्र स्वायत्त संस्था भारताचे माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉ. ए पी जे कलाम यांच्या नावाने स्थापन करून मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने करावे तसेच मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वायत्त संस्था स्थापन करण्यात यावी अशी मांगणी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन च्या शिष्टमंडळाने औरंगाबाद विभागीय आयुक्त यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळत निवेदन देण्यात आले. या वेळी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर, राज्य उपाध्यक्ष शफीक पठाण सर, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सय्यद ताजीमोद्दीन सर तसेच मराठवाडा अध्यक्ष डॉ. सोहेल नवाब आदींची उपस्थिती होती.