Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शेतकऱ्यांचा अडविलेला रस्ता राष्ट्रवादी मुळे झाला मोकळा

Responsive Ad Here

वंदना गवई जिल्हा  प्रतिनीधी 

चिखली:- मौजे येवता शिवारात मालकीची व ताब्यातील जमीन मधुन अर्जदार शेतकर्‍यांना यांच्या शेतात जाण्यासाठी गावठाणापासुन गट नं 306 मधुन रस्ता आहे. सदर रस्ता खुला करुन मिळणेबाबत बाबुराव गणपत काळे व ईतर शेतकर्‍यांनी तहसिलदार यांना गेल्या दोन वर्षापासुन विनंती केली होती. परंतु वारंवार अर्ज करुन सुध्दा कोणतीहि कार्यवाहि न झाल्याने पीडीत शेतकर्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी शंतनु बोंद्रे यांची भेट घेतली तात्काळ त्यांनी तात्काळ तहसीलदार यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली चर्चेत सकारात्मक उत्तर न मिळाल्यामुळे शंतनु बोंद्रे यांच्या नेतृत्वात असंख्य पीडित गावकरी व शेतकर्‍यांनी तहसिलदार यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन केले.


     येवता येथील शेतरस्ता काही लोकांनी अडवल्या मुळे गावकऱ्यांची खूप गैरसोय होत होती.बरेच दिवस निवेदने देऊन सुद्धा यावर तोडगा निघत नव्हता. आज शेतरस्ता खुला करून घे्यासाठी तहसिलदार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.या वेळी तहसीलदार यांनी विषय समजाऊन घेऊन शेतरस्ता तात्काळ मोकळा करून देण्याचे मंडळ अधिकारी यांना पत्र क्र.का.वि./प्रस्तु-1/ 1993/2021 दि. 23/12/2021 नुसार पत्र दिले तसेच नकाशाप्रमाणे असलेला रस्ता खुला करुन देण्याबाबत आदेश दिल्यानंतरच ठिय्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.

    या प्रसंगी प्रदेश प्रतीनीधी शंतनु भारत बोंद्रे, विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील,शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, शहर अध्यक्ष रविंद्र तोडकर, यांच्यासह बापूराव काळे, फुलसिंग परिहार, विष्णू परिहार, विठ्ठल परीहार, संदीप परीहार, भगवान परीहार, ज्ञानेश्वर परीहार, सागर परीहार, सिध्देश्वर परीहार, अजय परीहार आत्माराम परीहार, संतोष परीहार, प्रमोद काळे, राजू चव्हाण, वैभव जवंजाल आकाश परीहार, गणेश परीहार, सुभाष परीहार, विजयसिंह परीहार, मधू परीहार, सौ ज्योती परीहार, सौ शोभा काळे, सौ वंदना परीहार, सौ अनिता परीहार व गावकरी उपस्थित होते.