Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे साखळे!

Responsive Ad Here
मो.असलम परवेज:लोणार


मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी स्वायत्त संस्था सुरू करा; शेख अब्दुल रहीम


औरंगाबाद-  औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा युवासेनेचे प्रमुख ना आदित्य ठाकरे यांची प्रजासत्ताक दिनी भेट औरंगाबाद येथील प्रसिद्ध हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली.  परंपरा नुसार हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी पुस्तक आणि शाल देऊन सत्कार करण्यात केले त्यानंतर निवेदन सादर करण्यात आले.  निवेदनात खालील मांगण्या करण्यात आल्या.
1) मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सार्थी, बार्टी च्या धरतीवर त्याच पद्धतीने भारत रत्न डॉ.ए. पी.जे कलाम संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था या नावाने स्वायत्त संस्था स्थापन करण्यात यावे जेणेकरून मुस्लिम समाजालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल.



2) राज्यातील २०% तसेच ४०%टक्के अनुदानित शाळांना प्रचलीत नियमानुसार अनुदान जाहीर करण्यात यावं व त्रुटी पात्र शाळांच्या यादी लवकरात लवकर घोषित करण्यात यावी. आदी प्रमुख मांगण्यावर स्वतः लक्ष देऊन त्वरित सोडवण्याची विनंती करण्यात आली. यावर  ना.आदित्य ठाकरे  यांनी आपल्या मागण्या लवकरच मुख्यमंत्री कडे मांडण्याचे आश्वासन दिले. हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सय्यद ताजीमोद्दीन, शुभम दुतोंडे आदींची उपस्थिती होती.