Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भुसावळात प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

Responsive Ad Here

भुसावळ - प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील सेवाभावी सामाजिक सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व  भुसावळ रक्तदाते ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न झाले .  स्थानिक नेत्रम आय हॉस्पिटल  येथे आयोजित  रक्तदान शिबीरात प्रमुख पाहुण्या म्हणून समाज सेविका श्रीमती शैलाताई सावंत  व  जम्मु येथे सिमेवर सेवेत असलेले सीआरपीएफ मधील जवान गणेश चौधरी  यांच्या पत्नी सौ.उज्वला चौधरी या  उपस्थित होत्या. 


  शिबीरात १२ रक्तदात्यांनी  रक्तदान केले. प्रसंगी संस्थापक अध्यक्षा सौ राजश्री नेवे, माया चौधरी, स्मिता माहूरकर, अनुराधा टाक हे उपस्थीत होत्या . शिबिर यशस्वितेकरीता  निलेश फण्ड, तनिक्ष भोसले, भुसावळ ब्लड बॅकेचे महादेव मुळे, रविंद्र सुर्यवंशी  यांचेसह नेत्रम आय हॉस्पिटलचे डॉ एस एस मेश्राम व स्टॉफ तसेच  .प्रफुल्लजी लोढा यांचे अनमोल सहकार्य लाभले. शिबिरात कोविड-१९ च्या त्रिसुत्री नियमांचे काटेकोर पणे पालन करण्यात आले .