भीमराव चाटे प्रतिनिधी दे राजा
देऊळगाव राजा जवळील अकोला देव येथील सैन्यात देसी सीमेवर रक्षण करणारे तेहतीस जवान आहेत. गावातील एक तरुण व्यक्ती बाबासाहेब रतन छडीदार हे काही दिवसापासून कॅन्सर पीडित असून त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दवाखान्यातील खर्च छडीदार परिवाराला शक्य होईना ,अनेक सेवाभावी संस्थांना मीडिया वरून आणि व्हाट्सअप वरून त्यांनी मदतीचे आवाहन केले अकोला देव हे जाफराबाद तालुक्यातील सर्वाधिक सैनिकांची संख्या असलेले गाव म्हणून प्रसिद्ध हे विश्वची माझे घर असे समजणारे 33 जवान या तरुणाच्या मदतीसाठी धावले आणि त्यांनी एकमेकांना सोशल मीडिया वरून फोन पे द्वारे 33 हजार रुपये निधी संकलन केला.
आजी-माजी सैनिकांच्या सह सैनिकांच्या विधवा पत्नी सुद्धा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आणि 33 हजार रुपये निधी रुग्णाच्या आई कडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी सैनिक विष्णू सवडे कौतिक सावळे संजय छडीदार नितीन सावळे सिंधुबाई जाधव सरसाबाई बंदर के पुंजाराम कांबळे ईश्वर सवडे ऋषिकेश सवडे अंकुश भुमकर विठ्ठल आटपळे गिरी यांच्यासह ग्रामस्थांचे मोठ्या संख्येने उपस्थिती होती अडीअडचणीच्या काळात एकमेकांना साह करू अवघे धरू सुपंथ प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये सैनिकांकडून लोकवर्गणी साठी मोठ्या एकोप्याने येथील सैनिक योगदान देतात त्या सर्व सीमा रक्षक भारतीय जवानांना लष्कर दिनाच्या शुभेच्छा व आशीर्वाद कॅन्सर पीडित ची आई छडीदार आई यांनी दिले व त्यांचे आभार मानले