Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल येथे नगरपालिकेसह विविध ठिकाणी स्थानिक वार्ताहरांचा सत्कार

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल  प्रतिनिधी

    एरंडोल: येथे नगरपालिका व इतर संस्थांतर्फे ६जानेवारी २०२२ रोजी 'पञकार दिनानिमित्त, स्थानिक पञकारांचा सत्कार मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांच्या हस्ते करण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य बी.डी.बागुल हे होते.  लोकशाहीच्या जडणघडणी मध्ये पञकारांची भूमिका मोलाची असुन समाजप्रबोधन व जनजागृती करून समाजास व इतर क्षेञांना योग्य दिशा दाखविण्याचे काम पञकारांचे असल्याचे प्रतीपादन नगरपालिकेचे प्रशासक विकास नवाळे यांनी केले.  यावेळी शिवाजीराव अहीरराव, आल्हाद जोशी,कमरअली सैय्यद,कैलास महाजन,रतीलाल पाटील,शैलेश चौधरी, राजीव ठक्कर,कुंदन ठाकुर,प्रा.नितीन पाटील,राजधर महाजन,उमेश महाजन आदी उपस्थित होते.  प्रास्ताविक व आभार प्रदर्शन न.पा.चे कार्यालयीन अधीक्षक हितेश जोगी यांनी केले.


         एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे कार्यालयात गुलाबपुष्प देऊन सभासद पञकारांचा गौरव करण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद पाटील होते.  यावेळी शहराध्यक्ष कैलास महाजन,प्रा.सुधीर शिरसाठ, शैलेश चौधरी,कुंदन ठाकुर यांची समायोचीत भाषणेझाली.  प्रास्ताविक राजेंद्र ठाकरे यांनी केले. सुञसंचालन पंकज महाजन यांनी केले.  यावेळी उपाध्यक्ष देविदास सोनवणेंचा व प्रल्हाद पाटील, राहूल मराठे,चंद्रभान पाटील,बाबुलाल महाजन,मनोहर ठाकुर,रोहिदास पाटील,संजय बागड,नितीन पाटील,अजय महाजन,भिला पाटील,गणेश महाजन,प्रविण महाजन,उमेश महाजन आदी उपस्थित होते. तर आभार प्रदर्शन प्रा.नितीन पाटील यांनी केले. 
        आस्था महीला मंडळातर्फे अँड. मोहन बी.शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होऊन पञकारांचा सन्मान करण्यात आला. आरती ठाकुर,चंद्रकला जैन, नंदा जैन व इतर महीला उपस्थित होत्या. तसेच संध्याकाळी डॉ.पि.जी.पिंगळे व डॉ.मकरंद पिंगळे या पितापुञांतर्फे तालुक्यातील सर्व वार्ताहरांचा सत्कार करण्यात आला.