भीमराव चाटे प्रतिनिधी देऊळगाव राजा
संत चोखोबा उपेक्षित विद्रोही संत बऱ्याच वर्षांनंतर का होईना शासनाने दखल घेतली आणि पाच कोटी रुपये निधी मंजूर केला पन्नास लाख रुपयांचे कामे सुद्धा झाली ग्रामपंचायत पासून ते आमदार खासदार मंत्री पदापर्यंत सत्तेमध्ये बदल होतच राहणार मुंबईची बैठक आटोपून पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब थेट मुंबई औरंगाबाद ते मेव्हणा राजा जन्मस्थळी सायंकाळी पोहोचले संत चोखोबा यांची पूजा-अर्चना करून अभिवादन केले व मेहुणा राजा जन्मस्थळाच्या विकास कामासाठी मी कटिबद्ध असून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे कडून लवकरच निधी प्राप्त करून या जन्मस्थळाचा विकास केला जाईल असा विश्वास पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांनी दिला यावेळी सरपंच मंदाताई विष्णू बोंद्रे व ग्रामपंचायत सदस्य मेव्हणा राजा बांधकाम सभापती रियाज खा पठाण हरी मामा शेटे गजानन पवार विष्णू बोंद्रे रवी काकडे संतोष गाढवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते जन्मस्थळ आवर सकाळी सहा वाजेपासून ते संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत पूजा अर्चना चे कार्यक्रम चालू होते संत चोखोबा जन्मस्थळ कोणते कार्यक्रम करताना गावचे प्रथम नागरिक सरपंच व सदस्य यांना विश्वासात घेऊन कार्यक्रम करावे असे सरपंच मंदाताई विष्णू बोंद्रे म्हणाल्या.
उंबरठ्याशी कैसे शिऊ आम्ही जाती हिन ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा संत चोखोबा उपेक्षित संत विद्रोही संत आणि आजही संत चोखोबा च्या जन्मोत्सवास शासकीय पद्धतीने कार्यक्रम केले जातो कोरोना ची पार्श्वभूमी आणि गर्दीचे नियंत्रण सर्वांना मान्य आहे परंतु पंचक्रोशीतून येणारे टाळकरी वारकरी विणेकरी यांना मान सन्मान दिला नाही यासाठी वारकरी संप्रदाय आतून नाराजीचा सूर आहे दरवर्षी लाख सव्वा लाख रुपये निधी जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंजूर होतो संत चोखोबा पुरस्कार व 25 हजार रुपये राशी सुद्धा जाहीर झाली मग उपेक्षित संत चोखोबांचे भक्त वारकरी टाळकरी मंडळी यांना संत चोखोबा प्रमाणेच विद्रोह करावा लागणार का बारा महिने कार्यक्रम व्हायला हवेत संत चोखोबा महाराज जन्म तिथि व पुण्यतिथी आषाढी कार्तिकी एकादशी कार्यक्रम व्हायला हवे नुसते शासकीय पद्धतीने कार्यक्रम झाल्यास संत चोखोबा जन्मस्थळाच्या विकासाचे सर्व पक्ष आणि सत्ता विसरून समाजकारण व्हावे असे पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय व गावकरी यांचे मत आहे