प्रतिनिधी: जितेश कारिया
गोवंशाचा शिर विच्छेद, धड वेगळे, चार पायांचे चार तुकडे, अन रक्ताचा थारोड्याचे भयावह चित्र
हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे अत्यंत निर्दयतेने आणि क्रूरतेने गोवंशाची कत्तल सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकुन आरोपींना अटक करून तुकडे करून कत्तल केलेले गोवंश जप्त केले.
सविस्तर असे की गुप्त माहिती मिळाल्यावरून 23 जानेवारी रोजी पहाटे हिवरखेड चे ठाणेदार धीरज चव्हाण आणि त्यांच्या पथकाने धाड टाकली असता बेलखेड येथील टिपु सुलतान चौकात राहणारा शेख फकीरा शेख कादर कुरेशी हा त्याचे राहते घराच्या ओसरीत त्याचे साथीदार शेख गणी शेख बशीर कुरेशी वय 32, आणि शेख कलीम शेख फकीरा वय 18, दोन्ही राहणार बेलखेड यांच्यासह सूऱ्या घेऊन जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका गोवंशाची कत्तल करीत असताना मिळून आले.
सदर गोवंशाची मान व चारही पाय कापलेल्या अवस्थेत व चामडी काढलेल्या अवस्थेत दिसून आल्याने घटनास्थळावरून गोवंशाचे अंदाजे एक क्विंटल 20 किलो वजनाचे गोवंशाचे धड गोवंशाची मान, गोवंशाचे चार पाय, व भुरकट लाल रंगाच्या गोवंशाची कातडी चोवीस हजार रुपये किमतीचे गोवंश मास तसेच कत्तली करिता वापरण्यात आलेले एक लोखंडी पात्याचे सत्तुर, दोन कुऱ्हाड, रक्ताने माखलेली हत्यारे, असा मुद्देमाल पंचांसमक्ष घटनास्थळी जप्त करण्यात आला असून तिन्ही आरोपींविरुद्ध कलम 429, 34 भारतीय दंड विधान सहकलम 5, 5 क, 9, 9 अ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कारवाई अकोटच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रितू खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड ठाणेदार धीरज चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुनील बगडेकर, श्रीकृष्ण सोळंके, सुमन, निलेश खंडारे, विलास अस्वार, सर्वेश कांबे, धीरज साबळे, गणेश कवळे, प्रदीप तायडे, इत्यादींनी केली आहे.