Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ज्येष्ठ समाजसेवी जयदेवराव कराळे यांचे निधन

Responsive Ad Here
हिवरखेड प्रतिनिधी: जितेश कारिया


कोणतेही कर्मकांड न करण्याचा कराळे परिवाराचा निर्णय.. शेतातच करणार अस्थी व रक्षा विसर्जन

हिवरखेड येथील ज्येष्ठ समाजसेवी म्हणून नाव लौकिक असलेले जयदेवराव कराळे यांचे दि 22 जानेवारी शनिवार रोजी पहाटे निधन झाले. वयाच्या 97 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिवरखेड चे माजी उपसरपंच तथा सेवा सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष होते. तसेच ते हिवरखेड कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचे संचालक होते. हिवरखेड च्या राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांचे दीर्घकाळ प्रभुत्व होते. स्थानिक राजकारणात किंगमेकर म्हणून त्यांना ओळखले जात होते. 


दि 22 जानेवारीला त्यांच्यावर हिवरखेड येथे अंतिम संस्कार करण्यात आले. सेवा सहकारी सोसायटी चे विद्यमान अध्यक्ष सुरेश कराळे आणि लोकजागर मंच हिवरखेड चे शहराध्यक्ष सुप्रसिद्ध शिक्षक महेंद्र कराळे यांचे ते वडील होते. जयदेवराव कराळे यांनी आपल्या आयुष्यात नेहमीच अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृती केली तसेच बुरसटलेल्या विचारसरणी आणि गैरजरूरी कर्मकांड, थोतांड, अनिष्ट रूढी परंपरांना तिलांजली देण्याची त्यांची भूमिका होती. पुरोगामी महाराष्ट्रातील नागरिकांनी कुटुंबियांच्या मृत्यूनंतर केले जाणारी विविध कर्मकांडे हळूहळू कमी करून कायमची बंद करावेत असे प्रबोधनात्मक विचार जयदेवराव कराळे यांनी अनेकदा आपल्या हयातीत व्यक्त केले होते. म्हणून त्यांच्या इच्छेप्रमाणे आणि समाजात सकारात्मक संदेश जाण्यासाठी कराळे परिवाराने फक्त पाच दिवसांचा दुखवटा पाळून कोणत्याही प्रकारचे तेरवी, कर्मकांड, गोडजेवण, अथवा विविध प्रकारचे विधी न करता स्वतःच्या शेतातच त्यांच्या अस्थि आणि रक्षाविसर्जन करण्याचा निर्णय घेतला. कराळे कुटुंबीयांच्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.