मो.असलम परवेज
मोहम्मद आकीब तौफिक कुरेशी यांचे पक्ष संघटन व पक्ष बळकटीकरण करण्यासाठी केलेल्या प्रमाणीक कामाची दखल घेऊन बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने त्यांची निवड ओबीसी सेलच्या बुलढाणा जिल्हा सचिव या पदावर केली आहे. जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात यांच्या स्वाक्षरीने जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत आ. राहुल बोंद्रे यांच्या हस्ते मोहम्मद आकीब यांना नियुक्ती पत्र देऊन सदर पदावर निवड करण्यात आली व त्यांचे भव्य सत्कार करण्यात आले.
मित्रपरिवाराने त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच निवड झाल्याबद्दल अनुसूचित जाती जमातीचे प्रदेश समन्वयक साहेबरावजी पाटोळे यांच्या निवास्थानी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर यांच्या हस्ते त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.