जामनेर प्रतिनिधी
पीजे मलकापुर पर्यंत वाढविण्याच्या डीपीआर ला तत्काळ मंजुरी देण्यात यावी, यासाठी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व उन्मेषदादा पाटील यांची रेल्वे राज्यमंत्री व रेल्वे बोर्ड अध्यक्ष यांना मागणी.
पाचोरा जामनेर तालुक्याची प्रवाशांची वाहिनी पीजी रेल्वे बंद असल्यामुळे सुरू करण्यात यावे या मागणीसाठी दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन सादर केले कोविड महामारी मुळे मागील २ वर्षापासून बंद असलेली *पाचोरा-जामनेर पीजे रेल्वे* तत्काळ सुरु करण्यात यावी तसेच सदर पीजी रेल्वेच्या रुंदीकरण व मलकापुर पर्यंत वाढविण्याच्या कामाचा डीपीआर तत्काळ मंजूर करणे बाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व खासदार उन्मेषदादा पाटील यांची पीजे रेल्वे बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळासह रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे पाटील व रेल्वे बोर्ड अध्यक्ष श्री. विनय कुमार त्रिपाठी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
ब्रिटीश काळापासून सुरु असलेली पाचोरा-जामनेर पीजे रेल्वे कोविड महामारी मुळे मागील २ वर्षापासून बंद आहे. तसेच सदर रेल्वे रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात येणार आहे अशी मागील बऱ्याच दिवसापासून चर्चा होती. त्यामुळे सदर रेल्वे वर अवलंबून असलेले *व्यापारी, नागरीक व शेतकरी चिंतेत होते. सदर रेल्वे बंद होऊ नये यासाठी पीजे रेल्वे बचाव कृती समिती मार्फत अनेक प्रयत्न सुरु होते. सदर नागरिकांची शंका दूर करण्यासाठी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व उन्मेषदादा पाटील* यांनी सदर शिष्टमंडळासह दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्री व रेल्वे बोर्ड अध्यक्ष यांची भेट घेऊन पीजे रेल्वे विषयी सविस्तर चर्चा केली.
यावेळी पीजे रेल्वेचे इंजिन नादुरुस्त असुन, लवकरात लवकर इंजिनची दुरुस्ती करून पीजे सुरु करण्यात येईल, तसेच अर्थसंकल्प २०२१ मध्ये पीजे रेल्वेचे मंजूर असलेले रूळ रुंदीकरण व मलकापुर पर्यंतच्या वाढचा डीपीआर मध्य रेल्वे, मुंबई विभागाकडून रेल्वे मंत्रालयास प्राप्त असुन सदर डीपीआर वर शिफारस लवकरात लवकर करणेबाबत यावेळी दोन्ही खासदारांना आश्वासन देण्यात आले.