Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

उपेक्षित महीला घटकांचा एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे सन्मान

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

    एरंडोल:येथे एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे ८ मार्च२०२२ रोजी जागतिक महीला दिना निमित्त समाजातील उपेक्षित व विविध क्षेञातील पुरस्कार प्राप्त महीलांचा सत्कार येथील तहसिलदार.सौ. सुचिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पञकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद आण्णा पाटील हे होते. प्रारंभी उपस्थित मान्यवर अतीथींच्या हस्ते राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतीमांचे पुजन होऊन माल्यार्पण करण्यात आले.

    यावेळी कोविड काळात ग्रामीण रूग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणार्या न.पा.कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला.  धुणी-भांडी करणारी महीला सोनाली आनंद सैंदाणे,वर्षभर शेतमजूर म्हणुन राबणारी महीला विमलबाई खंडू महाजन, सफाई कामगार म्हणुन रोजंदारीने काम करणारी महीला इंदुबाई रतन खंडारे या तळागाळातील उपेक्षित असलेल्या महीलांना साडी-चोळी व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कासोदा येथील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त परीचारीका शोभा पाटील यांचा देखिल भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.



यावेळी प्रविण महाजन यांनी स्वरचित काव्य सादर केले. संसर्गाच्या भितीच्या सावटामुळे कटुंबातील व्यक्ती देखील जवळ येत नव्हती अश्या वेळी कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतांवर जवळील अंत्यसंस्कार करण्याचे काम जीव मुठीत धरून अहोराञ करणारे न. पा. कर्मचारी हरीचंद अटवाल,सचिन पटोणे,शंकर गोयर,मुकेश यादव यांचा कपडे देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी तहसिलदार सुचिता चव्हाण,प्रा.स्वाती शेलार,डॉ.रश्मि ठाकुर,शोभा पाटील यांची प्रमुख अतीथी म्हणुन उपस्थिती होती. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बी. एस. चौधरी यांनी केले. सुञसंचालन दिनेश चव्हाण व नितीन ठक्कर यांनी केले. तर आभार प्रदर्शन राजेंद्र ठाकरे यांनी केले. शैलेश चौधरी, कुंदन ठाकुर, कैलास महाजन, पंकज महाजन, राजधर महाजन,चंद्रभान पाटील,प्रल्हाद पाटील,पंडीत पाटील,रोहीदास पाटील,गोकुळ शिंपी आदी पञकार व अजय महाजन,खुशाल महाजन हे उपस्थित होते.