जामनेर प्रतिनिधी
शहरातील दत्तमंदिरातील परिसरात येथील खानदेश तेली समाज महिला मंडळ शाखेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कष्टकरी महिलांचा सन्मान स्त्री शक्तीचा हा विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष साधनाताई महाजन हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक नगरसेवक लीना ताई पाटील वैशाली भोंडे खान्देश तेली महिला समाज जिल्हा कार्याध्यक्ष वैशाली चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जागतिक महिला दिन निमित्त कष्टकरी महिला आशाबाई सोनार जयाबाई घोरपडे छायाबाई गुंफाबाई शोभाबाई सोनवणे ताराबाई सुरवाडे सविता दोडके बेबाबाई विसपुते पत्रकार मिनाबाई शिंदे या कष्टकरी महिलांचा शाल पुष्प गुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान श्री शक्तींचा उपक्रम राबविण्यात आला साधनाताई महाजन लीलाताई पाटील वैशाली भोंडे वैशालीताई चौधरी या मान्यवरांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन खानदेश तेली महिला समाज कार्याध्यक्ष वैशालीताई चौधरी तर आभार माधुरी चौधरी यांनी मानले या वेळी शितल चौधरी ललिता कुरकुरे सुनिता महाजन सुनिता दुसाने मनीषा लोखंडे सविता भगवान दोडगे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते