Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मराठवाडा अध्यक्ष पदी शेख अब्दुल रहीम यांची निवड

Responsive Ad Here

मो.असलम परवेज: लोणार तालुका प्रतिनिधी


           राजस्थान व छत्तीसगड प्रमाणे महाराष्ट्र राज्यातही  2005 च्या नंतर जे कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत त्यांना जुनी पेंशन योजना  लागू व्हावी यासाठी एक मोठी चळवळ उभी करणार आहे असे प्रतिपादन नवनियुक्त राज्य प्रवक्ता तसेच मराठवाडा अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी केले. 

                  25 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन (श्रमिक संघ रजिस्टर NGP 5704 ) च्या राज्य कार्यकारिणी मंडळाची बैठक संपन्न झाली यात महाराष्ट्र  राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता तसेच मराठवाडा अध्यक्ष पदी शेख अब्दुल रहीम यांची राज्यस्तरीय बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. शेख अब्दुल रहीम हे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात तसेच विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सदैव अग्रेसर असतात.  त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष शिवराम घोती व राज्य सचिव सचिन कुमार चव्हाण यांनी शेख अब्दुल  रहीम  यांची औरंगाबाद येथे एक महत्वाची बैठकीमध्ये राज्य प्रवक्ता तसेच मराठवाडा अध्यक्ष पदी निवड केली आहे. 



                      महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या सर्व राज्य कार्यकारिणीच्या मंडळांनी विश्वास व्यक्त केला की शेख अब्दुल रहीम हे नोव्हेंबर 2005 च्या नंतर जे कर्मचारी शासकीय/ निमशासकीय सेवेत लागलेले आहे त्यांना जुनी पेन्शन मिळावी याकरिता सर्व सहकारी सोबत संपूर्ण कार्यक्षमतेणे कार्य करतील या निवडी बद्दल सर्व शिक्षक संघटने च्या पदाधिकारी, नेते गण व मित्र मंडळीं तसेच सर्व हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यानी अभिनंदन केले.