Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

श्री शिवाजी महाविद्यालयातील श्रम संस्कार शिबिरांमध्ये बौद्धिक सत्राचे आयोजन.

Responsive Ad Here

चिखली प्रतिनिधी

        दिनांक 23/० 3 /2022 ला सातगाव भुसारी या ठिकाणी श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या बौद्धिक सत्रा करिता प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. गणेश मालटे उपस्थित होते. मालटे सरांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगून या शिबिराचा फायदा स्वतःच्या व्यक्तिगत विकासामध्ये कसा साधता येईल, हे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट करून सांगितले. स्वालंबना सोबतच स्वतःला शिस्त असणे ही किती गरजेचे आहे ,याविषयी विवेचन केले.


         प्रा.डॉ.गणेश मालटे शिबीरामध्ये मार्गदर्शन करतांना. म्हणून शिबिरातील प्रत्येक स्वयंसेवकाने दिलेले प्रत्येक काम हे अंतकरणापासून केले पाहिजे. त्याचबरोबर श्रमदानाचे महत्व सांगून या श्रमदानातून गावाचा विकास कसा साधता येईल व आपल्याला यासाठी काय करता येईल यावरही त्यांनी स्पष्टीकरण केले. या सत्राचे प्रास्ताविक डॉ. अनुराधा मुळे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून शिबिराची पार्श्वभूमी सांगितली. सूत्रसंचालन गणेश सोनोने यांनी केले तर, आभार प्रदर्शन कुमारी गायत्री देशमुख या विद्यार्थिनीने केले. या बौद्धिक सत्राच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.