Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

औदुंबर साहित्य रसिक मंच तर्फे एरंडोल येथे २ व ३ एप्रिल रोजी राज्यस्तरीय मराठी साहित्य सम्मेलन

Responsive Ad Here

 एरंडोल

     एरंडोल येथील औदुंबर साहित्य रसिक मंच तर्फे २ व ३ एप्रिल रोजी डी डी एस पी महाविद्यालयात राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी राज्यस्तरावरील अनेक दिग्गज विचारवत व ख्यातनाम साहित्यिकांची उपस्थिती राहणार आहे.त्यात उत्तम कांबळे,डॉ. श्रीपाल सबनीस,अडवोके ट उज्ज्वल निकम,अशोक जैन,व्ही डी पाटील,डॉ. केशव देशमुख (नांदेड),डॉ.सर्जेराव जिगे (औरंगाबाद),प्रा. बी एन चौधरी (धरणगाव),बंडा जोशी (पुणे),डॉ. तुळशीराम गुट्टे,ज्ञानेश्वर शेंडे, प्रशासक विकास नवाले आदी दिग्गजांचा समावेश असणार आहे.

    या संमेलनाचे उद्घाटन नामांकित साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे तर समारोप विधानसभेचे माजी सभापती अरूनभाई गुजराथी यांच्या अधयक्षतेखाली व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार चिमणराव पाटील, ऍडव्होकेट किशोर काळकर, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी व निलेश चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी बालकवी चौक नामकरण सोहळ्याने संमेलनाची सुरुवात होणार आहे. शेतकरी आमहत्या: साहित्यिकांची भूमिका या विषयावर परिसंवाद तसेच संतसाहित्य आणि समाजप्रबोधन या विषयांवर परिसंवाद रंगणार आहे. पद्मश्री भवरलाल जैन लिखित 'ती आणि मी, _संस्कृती संवर्धन, एक हास्यपंचमी- विनोदी कार्यक्रम, कथाकथन व कविसंमेलन या प्रमाणे कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

    याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान व गौरव करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचा रसिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष अमित पाटील, औदुंबर चे अध्यक्ष श्री.मोहन शुक्ला, उपाध्यक्ष प्रा.वा.ना. आंधळे व श्री.अरुण माळी, सचिव ऍड. श्री विलास मोरे, कार्याध्यक्ष श्री.प्रवीण महाजन, कोषाध्यक्ष सैय्यद जाकिर हुसैन यांनी केले आहे.