Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सरपंचांनी गावाला एक आदर्श कुंटुंब बनविणे हेच महान पुण्यकार्य भास्करराव पेरे पाटील .

Responsive Ad Here

प्रतिनिधी लोणार वंदना गवई 

     द्वेष कोणाचाही नको , सहकारीता , सदभावना , सद्गुण, सत्प्रेम, यांचे पवित्र वातावरण निर्माण करुण गावाला एक आदर्श कुंटुंब बनविणे हेच सरपंचाचे महान पुण्यकार्य आहे . असे मार्गदर्शन पाटोदा गावाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त मेरा बु येथे ३० मार्च रोजीच्या कार्यक्रमात काढले मेरा बु येथील चिखली राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गजानन वायाळ यांनी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या६१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाटोदा गावाचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता . 

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.प. चे उपसरपंच दिनकरराव डोगरदिवे हे होते तर प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष महेश शिंदे हे होते ,तर मंचकावर उपस्थित असलेले गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ अनिताताई लक्ष्मण वायाळ , महिला व बाल कल्याण सभापती सौ ज्योतिताई अशोकराव पडघान ,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गजानन वायाळ , माजी शिक्षण व बांधकाम सभापती विनायकराव पडघान , प.स. सदस्यां जुलेखाबी सत्तार पटेल , माजी जि.प. सदस्यां दुर्गाताई डोगरदिवे , कृ उ बा स माजी सभापती अशोकराव पडघान , माजी प.स. सदस्य अमोल पडघान , ग्रा.प.सदस्य सागर पडघान , सदस्यां कमलताई जोहरे, अर्चनाताई डोगरदिवे , परशुराम पडघान ,सत्तार पटेल , पत्रकार प्रताप मोरे , डिंगाबर पडघान , सरपंच सचिन खेडेकर ,तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पडघान ,पो पा बद्रीप्रसाद पडघान , सरपंच गुंजाळा दिपक केदार , सरपंच मधुकर वायाळ , सरपंच नारायण अप्पा चित्राळे ,ग्रा.प.सदस्य भारत पडघान , लक्ष्मण पडघान , पुरुषोत्तम पडघान , विठ्ठल पडघान , अमर पडघान ,के के पडघान , तथा आदी गावाचे सरपंच मंडळी उपस्थित होती . 



    कार्यक्रम प्रसंगी सुरवातीला सर्व मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि प्रास्ताविक मध्ये गजानन वायाळ यांनी गावाचा लेखाजोखा मांडून गावाची भीषण पाणी टंचाई कायमची दूर करण्यात येईल असे आश्वासन दिले . तसेच राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी भाजप सरकारच्या महागाईवर प्रकाश टाकत कार्यकर्त्यांसाठी रात्रंदिवस झटणार असे सांगितले , यावेळी अशोकराव पडघान , आणि विनायकराव पडघान यांची भाषणे झाली , 

    कार्यक्रमात आदर्श पाटोदा गावाचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील हे पुढे म्हणाले की पुठाऱ्यामुळे गावाचा विकास होत नाही विकास होतो तो सरपंच आणि ग्रामसेवका मुळे , मात्र यासाठी या दोघांना ग्रा.प. चा कारभार नियोजनबद्ध करणे गरजेचे आहे ,. शंभर टक्के वसुली , दरवर्षी करणे , पिण्याच्या नळाला मिटर बसून गावकऱ्यांना गरम पाणी बिस्लरीचे पाणी , थंड पाणी देणे , झाडे लावणे , सांडपाणी जिरवणे , शिक्षण ,व आरोग्य सुविधा राबविणे , वयोवृध्दांना ग्रा.प. माध्यमातून मदत करणे , शौचालय बांधणे , हे करण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करणे , मात्र गावकरी गावात श्रमदान न करता बाहेर देवस्थानवर जावून श्रमदान करतात मात्र गावाकडे दुर्लक्ष करतात . काही विरोधक जाणूनबुजून चागले काम करणाऱ्या माणसाला विरोध करतात त्या बाबतीत एक चागले उदाहरण देवून गावकऱ्यांना पोट धरुन हसविले , आदी विविध गावाच्या विकासा बाबतीत मार्गदर्शन करून गावकऱ्यांना मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाला ग्रा.प. सर्व सदस्य सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य , तथा गावातील विजू पाटील , अण्णा पडघान , विनायक पडघान , दिनकर पडघान ,गजानन मापारी , बाबूलाल जोहरे , मुजु पटेल , राहुल डोगरदिवे ,अश्रूबा डोगरदिवे , रामदास डोगरदिवे , सांडू शहा , अश्विन अंभोरे , राजेंद्र डोगरदिवे , प्रवीण लहाने , व तरूण वर्गांनी मोठे सहकार्य केले , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात कवी अजीम नवाज राही यांनी केले तर आभार प्रदर्शन सागर पडघान यांनी मानले .