गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल: येथे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्ताने महात्मा फुले युवा क्रांती मंच तर्फे १० एप्रिल व ११ एप्रिल २०२२ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १० एप्रिल रोजी सायंकाळी ७:३० वाजता सत्यशोधक समाज संघाचे संयोजक अरविंद खैरनार व राष्ट्रीय महासचिव डॉ.सुरेश झाल्टे यांचे व्याख्यान महात्मा फुले पुतळ्याजवळ होणार आहे.
११एप्रिल रोजी सकाळी ७:३० वाजता महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व शहराच्या प्रमुख मार्गांवर मोटरसायकल रँली तर सायंकाळी ५:०० वाजता शहरातुन सजिव देखावा मिरवणुक निघणार आहे. नागरीकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
